Just another WordPress site

डि.एल.एड ऑनलाईन प्रवेशासाठी ४ जुलैपर्यंत मुदतवाढ; आमदार किरणराव सरनाईक यांच्या मागणीला यश

वाशिम : डि.एल.एड (D.L.Ed) प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२३ २४ करिता मुदतवाढ मिळाली असून विद्यार्थ्यांना आता ४ जुलै पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज करता येणार आहेत. यासंदर्भात शिक्षक आमदार अॅड. किरणराव सरनाईक (Adv. Kiranrao Sarnaik)यांच्या मागणीची दखल संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी घेतली असून १३ जुन ते २७ जुन पर्यंत असलेल्या प्रवेश प्रक्रियेला ४ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. (D.L.Ed online admission now extended till July 4; Notice of the demand of MLA Kiran Rao Sarnaik)

उच्च माध्यमिक शालांत परिक्षा इयत्ता १२ वीचा निकाल लागल्यानंतर डी.एल.एड. अभ्यासक्रम २०२३ – २४ करीता ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे असे आवाहन संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले होते. इयत्ता १२ वी नंत्तर शिक्षण क्षेत्रात करीयर करण्यासह स्पर्धापरिक्षेमध्ये सुध्दा डी. एड अभ्यासक्रमाचा फायदा होतो. त्यामुळे अनेक मुलांचा डी.एड करण्याकडे कल असतो. यावर्षी डी.एड प्रथम वर्षाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. १३ जुन ते २७ जुन दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचे होते. मात्र, विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी प्रवेशासाठी होणारी धावपळ त्याचप्रमाणे शासनाच्या सेतु केंद्रावरून शासकीय कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी होणारा विलंब यामुळे डि.एड् प्रथम ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्याकडे केली होती. या संदर्भात मुदत वाढ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अवधी मिळाला आहे.

हे ही वाचा : मालेगाव एसटी बस स्थानकात कायमस्वरूपी नियंत्रक नाही; लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष, प्रवाशांची गैरसोय

आता अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रक तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत सविस्तर सुचना प्रवेश नियमावली यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. डी. एड. प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांना अथवा पालकांना अर्ज भरण्यास अडचणी असतील तसेच अर्जामध्ये कुठल्याही त्रुटी राहु नये. व्यवस्थित अर्ज भरला जावा यासाठी श्री. शिवाजी डि.एड. कॉलेज वाशिम येथे संपर्क करावा असे आवाहन कॉलेजतर्फे भारती देशमुख यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!