Just another WordPress site

केजरीवाल आज देणार सीएमपदाचा राजीनामा ? उपराज्यपालांना भेटण्याची वेळ ठरली, आपच्या बैठकीत ठरणार नवा मुख्यमंत्री

नवी दिल्ली: तुरुंगातून जामिनावर बाहेर येताच ४८ तासांत मुख्यमंत्रीपद सोडण्याची घोषणा करणारे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) मंगळवारी उपराज्यपालांना भेटणार आहेत. या भेटीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा उपराज्यपालांकडे सोपविण्याची शक्यता आहे. यादरम्यान, राजकीय हालचालींना वेग आला असून नवा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी सोमवारपासूनच आप नेत्यांच्या (Aam Aadmi Party) बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. पक्षाच्या विधिमंडळ दलाच्या बैठकीत मंगळवारी दुपारपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय शक्य आहे.

मोदी सरकारने १० वर्षांत जनतेचे ३५ लाख कोटी लुटले; मल्लिकार्जुन खर्गेंचा आरोप 

कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगातून बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आपण येत्या ४८ तासांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहोत, असे केजरीवाल यांनी रविवारी जाहीर केले होते. त्यानुसार दिल्लीत सुरू झालेल्या राजकीय घडामोडीतच त्यांनी सोमवारी उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना भेटण्यासाठी वेळ मागितला. उपराज्यपालांनीही ही विनंती स्वीकारत केजरीवाल यांना भेटीसाठी मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेची वेळ दिल्याची माहिती आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी दिली.

राहुल गांधींबाबत विरोधकांना धास्तीच;  आमदार सतेज पाटील यांचा टोला  

या भेटीत केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा उपराज्यपालांकडे सुपुर्द करणार असल्याची शक्यता आहे. अशातच मुख्यमंत्रीपदाचा नवा चेहरा ठरविण्यासाठी आम आदमी पक्षातील हालचालींनाही वेग आला आहे. यासाठी पक्षाच्या ६० आमदारांच्या विधिमंडळ दलाची बैठकही मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता बोलविण्यात आली आहे. या बैठकीत केजरीवाल राजीनामा देण्यापूर्वी पक्षनेत्यांसोबत मुख्यमंत्रीपदाच्या नावावर चर्चा केली जाईल, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी ही बैठक होणार आहे. बैठकीत ज्या नावावर अंतिम एकमत होईल, त्या उमेदवारास मुख्यमंत्री बनविले जाईल.

दरम्यान, सोमवारी केजरीवाल यांच्या निवासस्थानी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची अर्थातच पीएसीची बैठक झाली. या बैठकीतही केजरीवाल यांनी वन टू वन चर्चा करीत मुख्यमंत्रीपदाबाबत प्रत्येक पक्षनेत्याची मते जाणून घेतली. बैठकीत मनीष सिसोदिया, संजय शर्मा, दुर्गेश पाठक, आतिश, गोपाल राय, इमरान हुसैन, राघव चड्ढा, राखी बिडलान, पंकज गुप्ता व एन. डी. गुप्तांसह अनेक नेते सहभागी होते.

Ahmednagar News : बेशिस्त वाहतुकीमुळे तारकपूर रस्त्यावर कोंडी 

उल्लेखनीय बाब म्हणजे, जोपर्यंत लोक आपल्याला प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देत नाहीत, तोपर्यंत आपण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार नाही, असे राजीनामा देण्याचा निर्णय घोषित करताना केजरीवाल रविवारी म्हणाले होते. दिल्लीतील निवडणूकही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यांच्या या घोषणेनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी नवा चेहरा कोण ? याची चर्चा रंगली आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता, आप नेते कैलाश गहलोत, गोपाल राय, सौरभ भारद्वाज व आतिशी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!