Just another WordPress site

निकालाआधीच पवारांनी फोडला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पेपर; म्हणाले ‘हाच’ उमेदवार होईल कॉंग्रेसचा अध्यक्ष

मुंबई : आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेत भाजपचं कौतुक केलं. विषय होता भाजपने अंधेरी पोटनिवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय. या निर्णयाच शरद पवारांकडून स्वागत करण्यात आलं आहे. याआधी रमेश लटकेंना श्रद्धांजली म्हणून भाजपने उमेदवारी मागे घ्यावी, असं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं, त्यानंतर शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन अशीच भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची विधानसभेवर बिनविरोध निवड व्हावी, अशी मागणी केली.

दरम्यान आज झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतही त्यांनी भाष्य केलं. निवडणुकीच्या निकालाआधीच त्यांनी अध्यक्षपदाचं नाव सांगितलं. यावेळी शरद पवार म्हणाले की, काँग्रेस पक्षात अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जे निवडून येण्याची शक्यता आहे, त्यात मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव दिसतय. खर्गे व आम्ही सर्वजण संसदेत एकत्ररीत्या काम करत आहोत. त्यामुळे अनेक वर्षांपासून संघटनेत काम करणारी व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय आम्हा सर्वांना आहे. त्यामुळे अशी व्यक्ती त्याठिकाणी आल्यास त्याचा परिणाम संघटनेच्या दृष्टीने चांगला होईल.

भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी मागणी रविवारी शरद पवारांनी केली होती. शरद पवारांच्या या मागणीचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं. शरद पवार ज्येष्ठ नेत असून त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा दाखवला. शिवसेना कुटुंब त्यांच्या बद्दल सदैव आभारी राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!