Just another WordPress site

How much gold and cash can be kept in the house? तुम्ही तुमच्या घरात किती रोख रक्कम आणि सोनं बाळगू शकता? कायदा काय सांगतो

गेल्या आठवड्यात ईडीने तीन मोठ्या कारवाया केल्या. यात अर्पिता मुखर्जीच्या घरातून ईडीने सुमारे ५० कोटी रक्कम आणि ६ किलो सोने जप्त केलं. तर पश्चिम बंगालमधून काँग्रेसच्या ३ आमदारांकडून  बेहिशेबी ५० लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली.  तर पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकून ईडीने ११ लाखांची रक्कम जप्त केली. दरम्यान, तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आपण घरात किती रोख रक्कम आणि सोने ठेवू शकतो? चला याच विषयी जाणून घेऊ.



महत्वाच्या बाबी 

१. गेल्या आठवड्यात ईडीकडून ३ मोठ्या कारवाया 

२. देशात सोन्याच्या गुंतवणुकीबाबत आहेत नियम 

३. विवाहित स्त्रीला ५०० ग्रॅम दागिने ठेवण्याची मुभा 

४. विवाहित पुरुष घरात १०० ग्रॅम सोने ठेवू शकतात


खरंतर भारतीयांना सोन्याविषयी असणारं आकर्षण ही काही नवी बाब नाही. आजही अनेकजण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला प्राधान्य देतात.  मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने सोने खरेदी, गुंतवणूक आणि त्याच्या साठवणुकीबाबत काही नवे नियम लागू केले. आणि या नियमांचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तीला कारवाईला सामोरे जावं लागू शकते. 


घरात किती सोनं साठवू शकता?

देशात आधी १९६८ चा सुवर्ण नियंत्रण कायदा होता, ज्यामध्ये ठराविक रकमेपेक्षा जास्त सोने ठेवण्यावर नजर ठेवण्यात येते. मात्र, जून १९९० मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला. त्यामुळं आता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कितीही सोनं घरात ठेवू शकता.  केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या माहितीनुसार, तुम्ही कायदेशीर मार्गाने सोनं खरेदी केलं असेल आणि त्याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर घरात कितीही सोनं साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. मात्र, आयकर विभागाकडून घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याची तपासणी होऊ शकते. जर तपास यंत्रणेने तुमच्या घरी छापा टाकून सोनं जप्त केलं, तर आयकर कायदा १९६१ च्या कलम १३२ नुसार, आयटी अधिकार्‍यांना त्याची अधिकृत माहिती विचारण्याचा अधिकार आहे. यावेळी तुम्हाला सोनं खरेदी केल्या संबंधीची कागदपत्रे दाखवावी लागते. जर तुम्हाला भेटवस्तूमध्ये सोने मिळालं असेल, तर त्याच्याशी संबंधित गिफ्ट डीड दाखवावे लागेल. आयकर विभागाच्या नियमानुसार, लग्न झालेल्या स्त्रीला घरात ५०० ग्रॅम दागिने ठेवण्याची मुभा आहे. अविवाहीत स्त्री घरात २५० ग्रॅम तर विवाहित किंवा अविवाहित पुरुषांना घरात १००  ग्रॅम सोने बाळगण्याची मुभा आहे.  तसेच यासाठी संबंधित व्यक्तीला उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज भासणार नाही. मात्र, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात यापेक्षा जास्त प्रमाणात सोने ठेवले असेल तर त्याला त्याच्या स्त्रोताची माहिती द्यावी लागेल. 


घरात किती रक्कम बाळगता येईल? 

सोन्या प्रमाणाचं पैशालाही महत्व आहे. कोणताही सामान्य माणूस आपल्या घरात हवी तितकी रक्कम ठेऊ शकतो.  घरी रोख ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. मात्र,  या रकमेची अधिकृत माहिती असणं आवश्यक आहे. समजा तुमच्या घरात ५ कोटी रुपये ठेवले आहेत आणि तपास यंत्रणांनी छापा टाकला तर अशा परिस्थितीत तुम्हाला या रकमेशी संबंधित अधिकृत पुरावे दाखवावे लागतील. तुम्ही कोणत्या माध्यमातून हे पैसे कमावले याचंही स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. जर तपासादरम्यान तुम्ही तुमच्या घरातून जप्त केलेल्या रकमेची अधिकृत माहिती न दिल्यास, तुम्हाला १३७ टक्क्यांपर्यंत  दंड भरावा लागेल. याशिवाय, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या २६ मे २०२२ पासून देशात लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, एक व्यक्ती एका वर्षात २० लाख रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार करू शकत नाही.

दरम्यान, जर संबंधित व्यक्ती छाप्यात सापडलेल्या रोख रक्कम किंवा सोन्याच्या संदर्भात योग्य माहिती देऊ न शकल्यास किंवा उत्पन्नाचा सोअर्स दाखवू शकत नसल्यासं तपास यंत्रणांकडून तो पैसा किंवा सोनं जप्त केल्या जातं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!