Just another WordPress site

What is the national flag of which country called? भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हणतात; पाकिस्तान, चीन, अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाला काय म्हणतात?

साधारणत: कुठल्याही देशातील राष्ट्रध्वजाला त्या देशाच्या नावाने ओळखलं जातं.  भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हणूनच जगभरात प्रसिद्धी आहे. जसं भारताच्या राष्ट्रध्वजाला ‘तिरंगा’ म्हणतात,  तसंच इतर देशांच्याही राष्ट्रध्वजाला वेगवेगळी नावं आहेत. पाहूया कोणत्या देशाच्या राष्ट्रध्वजाला काय म्हणतात.



महत्वाच्या बाबी 

१. आपला राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक 

२. भारताच्या राष्ट्रध्वजाला ‘तिरंगा’ म्हणून जगभर ओळख 

३. पाकच्या झेंड्याला परचम- ए-सितारा ओ- हिलाल म्हणतात 

४. श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाला लॉयन फ्लॅग असं संबोधल्या जाते 


भारतीय राष्ट्रध्वज भारतातील लोकांच्या आशा आणि आकांक्षा दर्शवतो. जेव्हा आपण आपल्या देशाचा झेंडा पाहातो, तेव्हा आपली मान आपोआपच गर्वाने उंचावली जाते. आपला राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे, अशीच भावना जगातील प्रत्येक नागरीकाला त्याच्या देशाच्या झेंड्याच्या बाबतीत असते. जगभरात अनेक देश आहे, त्या देशांचे ध्वज हे त्यांचं प्रतीक असतं. जगातल्या प्रत्येक देशाचा झेंडा हा तिथल्या लोकांशी भावनिक आणि गौरवशाली इतिहासानं जोडलेला आहे. बऱ्याचदा  पाकिस्तानचा झेंड्यांना पाकिस्तानचा ध्वज, इंग्लंडच्या झेंड्याला इंग्लंडचा ध्वज म्हणून आपण संबोधतो. मात्र, या देशांच्या ध्वजालाही विशिष्ट नावं आहेत. या देशांच्या झेंड्यांना तिकड्या अस्मितेशी जोडणारी नावं देण्यात आलेली आहे. ब्राझील या देशाची राजधानी ब्रासीलिया आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला ऑरिवर्दे म्हणतात. तर  टर्की या देशाच्या झेंड्याचा उल्लेख नागरिक अलबेरक म्हणून करतात. कतर  या देशाचा राष्ट्रध्वज  इन्नाबी म्हणून ओळखला जातो. डबलिन राजधानी असलेल्या आयरलँडच्या राष्ट्रध्वजाला ब्रताश म्हणतात. न्यूझिलंडच्या राष्ट्रध्वजाला इनसाइन  म्हणतात. तर तिब्बतचा राष्ट्रध्वजाला स्नो लायन फ्लॅग म्हणून ओळखला जातो. ज्या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला लोकशाही मूल्ये, समानता आणि स्वातंत्र्याचा आदर्श दिला. त्या फ्रांसच्या राष्ट्रध्वजाला फ्रेंच ट्रायकलर म्हणतात. भारतावर दिडशे वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या राष्ट्रध्वजाला यूनियन जॅक किंवा यूनियन फ्लॅग म्हणतात. अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाला स्टार्स अँड स्ट्राइप्स किंवा स्टार स्पैंगल्ड बॅनर किंवा ओल्ड ग्लोरी असं संबोधल्या जातं.  श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाला लॉयन फ्लॅग आणि सिन्हा फ्लॅग म्हणतात. चीनच्या राष्ट्रध्वजाची ओळख वू शिंग होंग अशी आहे.  तर आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानच्या झेंड्याला परचम – ए-सितारा ओ- हिलाल म्हणतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!