Just another WordPress site

Lord Ganesh on Note : जगातल्या ‘या’ मुस्लीम देशातील नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो का छापतात?

हिंदू – मुस्लीम वाद काही नवा नाही. अनेकदा आपल्या देशात त्यावरून दंगे देखील झालेत. मात्र, जगात असा  मुस्लीम बहुल देश आहे, ज्याच्या चलनी नोटांवर गणपतीचा फोटो आहे. विश्वास नाही ना बसत? पण हे सत्य आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की,  सर्वाधिक मुस्लिम संख्या असलेल्या देशात हिंदुचा देव असलेल्या गणपतीचा फोटो कसा? आणि का?शिवाय तो देश आहे तरी कोणता?  हे देखील जाणून घेण्याची तुमचा उत्सकता असेल. तर चला याच विषयी जाणून घेऊ.



महत्वाच्या बाबी 

१. शुभ कार्यात सगळ्यात पहिला मान गणपती बाप्पाचा 

२. इंडोनेशियात मुस्लिमांची संख्या ८७ तर हिंदू ३ टक्के

३. इंडोनेशियातील २० हजाराच्या नोटेवर आहे गणपती

४. इंडोनेशियात गणेशाला कला, विज्ञान, शिक्षणाची देवता मानतात 

आद्यपूजेचा मान असणारे आणि सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे भारताचे खास दैवत म्हणजे गणराज. गणपतीची आराधना आपल्याला अगदी बालपणापासून शिकवलेली असते. कोणत्याही गोष्टीचा आपल्याकडे पहिला श्रीगणेशा होतो!  शुभ कार्यात सगळ्यात पहिला मान गणपती बाप्पाचा असल्याने साहजिकच भारतात ठीक ठिकाणी गणेशाचे वंदन पहिले केले जाते. मात्र,  गणपतीचा फोटो किंवा चित्र कधी कुठल्या नोटेवर आपण पाहिलेलं नाहीय. मात्र, इंडोनेशिया या मुस्लीम बहुल देशाच्या नोटेवर गणेशाचं चित्र आहे. या देशात मुस्लिमांची संख्या ही ८७ टक्के असून हिंदू केवळ ३ टक्के आहेत. इथली करन्सी भारतासारखीच आहे. इथे रुपया चालतो.  या देशाच्या २० हजाराच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे.  इंडोनेशियातील २० हजाराच्या नोटेवर गणपती तर मागे वर्गाचा फोटो आहे. वर्गाच्या फोटोमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी देखील दिसतात. शिवाय, इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचा देखील फोटो आहे. देवांत्रा हे स्वातंत्र्यासंग्रमात देखील अग्रेसर होते. या देशाच्या नोटेवर गणपतीचा फोटो असल्याचं कारण म्हणजे,  काही वर्षांपूर्वी इंडोनेशियामध्ये अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. त्यावेळी विचारविमर्श करून अर्थतज्ज्ञांनी २० हजाराची नोट चलणान आणण्याचा निर्णय झाला.  हा निर्णय झाल्यानंतर या नोटांवर गणपतीचा फोटो छापण्याचाही निर्णय झाला. यावर लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हापासून नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आला तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली. गणपतीला या देशात कला, विज्ञान, शिक्षण याची देवता मानलं जातं.  इंडोनेशियामध्ये केवळ नोटेवर गणपतीचाच फोटो नाही तर, इंडोनेशियाच्या मॅस्कोटवर हनुमान आहे. शिवाय, फेसम टुरिझम टेस्टिनेशनवर अर्जुन आणि श्रीकृष्णाची मूर्ती लावण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!