Just another WordPress site

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन च्या टोळीने भेंडीबाजार परिसरातील जे जे सिंगल जवळ केलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने छोटा राजन सह आणि इतर तीन आरोपींना पुराव्याच्या अभावे निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 13 वर्ष हा खटला चालला. पण, पुराव्याअभावी आरोपींची सुटका करण्यात आली आहे.

आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश ए एम पाटील यांनी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहे. २९ जुलै २००९ मध्ये हत्या झाली होती. आरोपी १२ वर्षापासून न्यायालय कोठडी होते. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सह ४ आरोपींची दुहेरी हत्याकांड प्रकरणामधील केस क्रमांक १८८ / २०११ छोटा राजन आणि त्याच्या टोळीतील इतर ३ या केसमध्ये पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

जे जे सिग्नलजवळ झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. छोटा शकील टोळीतील असिफ दाढी उर्फ छोटे मिया आणि शकील मोडक या दोघाची २९ जुलै २००९ ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या डबल मर्डर प्रकरणात कट रचल्याचा छोटा राजनवर आरोप होता. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन, मोहम्मद अली जान, प्रणय राणे, उमेद आणि छोटा राजन हे चौघे आरोपी होते.

न्यायालयाने या प्रकरणात निकाल देताना असे निरीक्षण नोंदवले की, या प्रकरणात आरोपीचे घटना झाल्यानंतर दीड वर्षानंतर आरोपींची ओळख चाचणी करण्यात आली होती. तपासातील विसंगती, ओळख परेडमध्ये अपयश, वापरलेली वेपन्स आणि बुलेट्स मॅच न झाल्यानं तसेच पुरावे हा गुन्हा सिद्ध करायला, सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!