Just another WordPress site

शिंदे-फडणवीस सरकारला २ महिनेही पुर्ण झाले नाही, अन् कुरबुरी सुरू; पुढची वाटचाल अवघड?

शिंदे यांच्यासोबत सेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने ठाकरे सरकार कोसळलं. अन् राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं. शिंदे गट हा आपण असलेली शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचं सांगतोय. आता हा वाद सुप्रीम कोर्टाच्या दारात आहे. अशातच शिंदे सरकारला दोन महिने पूर्ण होत नाहीत तोच भाजप-शिंदे गटातही कुरबुरी वाढताहेत. 



महत्वाच्या बाबी 

१. भाजप आणि शिंदे गटातील कुरबुरी वाढत आहेत

२. समन्वयाची जबाबदारी कुलकर्णी यांच्या खांद्यावर 

३. अमरावतीत भाजपचा उमेदवार निवडून येईल 

४. त्यांच्या वक्तव्याने शिंदें गटातील खासदारांची धाकधूक 

गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला राणे-केसरकर वाद हे सरकार आल्याच्या सुरूवातीपासून पाहायला मिळाला. भाजप-सेना मागच्या वर्षीच एकत्र येणार होते, मात्र, राणेंनी सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेतल्यांनं उद्धव ठाकरे नाराज झाले. शिवाय, राणेंना केंद्रात मंत्री केल्यानं युतीची बोलणी होऊ शकली नाहीत, असा दावा केसरकरांनी केला.दरम्यान, केसरकरांनी नरमाईची  भूमिका घेतली. भाजप-शिवसेनेमध्ये असा वाद निर्माण होऊ नये म्हणून मी राणेंबाबत एकही पत्रकार परिषद घेणार नाही आणि सोबत काम करू, असं केसरकर म्हणाले.  त्यांच्या या वक्तव्यानंतर निलेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ‘दीपक केसरकर म्हणतात, राणेंसोबत काम करायला तयार आहे. नोकरी मागायची आहे, तर नीट मागा, आमच्याकडे १ तारखेपासून ड्रायव्हरची जागा खाली ,’ असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं होतं. मात्र, नंतर लगेच त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. शिंदे-भाजप यांच्यातील दुसरा वाद म्हणजे, सोमय्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर माफिया मुख्यमंत्र्याला हटवल्याबद्दल धन्यवाद, असं ट्वीट केलं होतं.  त्यांच्या ट्वीटवर शिंदे गटाने आक्षेप घेतला होता.  ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करायची नाही, असं ठरवलं आहे. त्यामुळे सोमय्यांना आवर घाला, अशी तक्रार शिंदे गटाने फडणवीसांकडे केली होते.तिसरं नाराजीचं कारण म्हणजे, शिंदे मुख्यमंत्री झाल्यानं भाजप नेते खुश नसल्यांचं दिसतं. मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटीलयांनी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. अशातच आता  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणखी एक नवा वाद निर्माण झाला.  बुलढाण्यात आणि अमरावतीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून येईल असं  वक्तव्य त्यांनी केलं.  त्यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण, शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर खासदारांनीही एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वाकारले. त्यांच्या वक्तव्याने शिंदें गटातील खासदारांची धाकधूक वाढली.  अमरावतीतूत २०१९ च्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा विजयी झाल्या होत्या. दरम्यान, बावनकुळेंनी या वक्तव्यातून नवनीत राणा भाजपमध्ये येणार असल्याचे संकेत दिले. बावनकुळेंच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटात गेलेले शिवेसना नेते आनंदराव अडसूळ नाराज झाले असून त्यांची चांगलीच धाकधूक वाढली. शिवाय, बुलढाण्यात २०२४ मध्ये सेना-भाजप युतीचे उमेदवार असणार अशी प्रतापराव जाधवांना आशा होती.  मात्र बावनकुळेंच्या वक्तव्याने जाधवांच्या आशेवर पाणी फिरले. त्यामुळं राज्यात शिंदे गट-भाजप यांच्यातील युतीत तणाव निर्माण होत असल्याचं चित्र असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.  याशिवाय,  भाजपच्या  मंत्र्यांना सर्वाधिक निधी मिळाल्याने शिंदे गटाचे आमदार नाराज झाले होते. दरम्यान, आता या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे आणि फडणवीस यांनी शिंदे गट आणि भाजपमधील समन्वयासाठी आशिष कुलकर्णी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली. दोन्ही गटातील आमदार आणि मंत्र्यांमध्ये सुसंवाद ठेवण्याचं आणि शिंदे गटातील आमदारांच्या समस्या सोडवण्याचं काम कुलकर्णी यांच्याकडे आहे. दरम्यान, आशिष कुलकर्णी हे शिंदे गट-भाजप यांच्यात कसा समन्वय ठेवतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!