Just another WordPress site

प्रकाश आंबेडकरांसोबत युती करणार नाही : संभाजीराजे

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Alliance) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या (Aurangzeb) समाधीस्थळी गेले होते. तिथे त्यांनी औरंजेबाच्या कबरीवर चादर चढवली होती. त्यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटही अडचणीत आल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज प्रकाश आंबेडकर यांना चांगलंच फटकारलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना त्रास देणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा खून करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक कुणी कसं करु शकतो? असा सवाल संभाजीराजे यांनी केलाय. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या कृतीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. तसेच आपण प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करणार नाही, असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे. (Will not form alliance with Prakash Ambedkar: Sambhaji Raje)

संभाजीराजे यांची ही भूमिका समोर आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण औरंगजेबाच्या | कबरीसमोर का झुकलो? याचं कारण सांगितलं. यावेळी त्यांनी खूप मोठा दावा देखील केला आहे. आपण औरंगजेबाच्या समाधीस्थळी जावून भेट दिली त्यामुळे महाराष्ट्रातील दंगली थांबवण्यात आपल्याला यश आलं, असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांच्या या दाव्यावर आता इतर पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

संभाजीराजे संगमेश्वरला का गेले? यावर वाद आहे. त्यांची माहिती औरंगजेबपर्यंत कशी पोचली? जयचंदमुळे गेले, असा इतिहास आहे. औरंगजेबाने जो दंड दिला त्याची आम्ही निंदा करतो. गणोजी शिर्के, रामनाथ स्वामी यांनी संभाजीराजे संगमेश्वरला असल्याची माहिती पोहोचवली, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!