Just another WordPress site

Why give color to tree trunks? झाडांच्या खोडाला पांढऱ्या आणि लाल रंगानं का रंगवलं जातं? त्याचं नेमकं कारण तरी काय?

तुम्हाला रस्त्यावरून जाताना नेहमीच रस्त्याच्या दुतर्फा झाडं दिसतात. या झाडांना पांढरा आणि लाल रंग असतो. मात्र, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या खालच्या भागाला पांढरा आणि लाल रंगाच्या पट्ट्या का असतात? याचा कधी विचार केलाय का? याच विषयी जाणून घेऊ.



महत्वाच्या बाबी 

१. झाडांच्या खोडांवर रंग लावण्याचीपद्धत जुनी आहे

२. रंग देण्यामागे झाडांना मजबूत करणं हा हेतू आहे

३. रंग दिल्यानं किडे, बुरशीपासून झाडाचं रक्षण होतं

४. काही ठिकाणी लाल आणि निळा रंगही दिल्या जातो 

अनेकदा भटकतांना तुम्ही रस्त्यांच्या दुतर्फा लावलेली झाडे पाहिली असतीलच. हायवे म्हणा, एखादा खाजगी रस्ता म्हणा किंवा शहराच्या आतील एखादा रस्ता म्हणा! या रस्त्यांवर लावलेल्या झाडांबदल एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल की त्यावर पांढरा रंग लावलेला असतो.  झाडांच्या खोडांवर रंग लावण्याचीही पद्धत खूप जुनी आहे. खरंतर हिरव्यागार झाडांना अधिक मजबूत करणं हा त्याचा हेतू आहे. तुम्ही पाहिलं असेल की झाडांमध्ये बऱ्याचदा फट, चीरा पडतात. आणि यामुळे साल बाहेर पडायला लागते, त्यामुळे झाडं कमकुवत होऊ लागतात. म्हणून, त्यांना मजबूत करण्यासाठी रंग दिला जातो.

झाडांच्या खोडांना रंग दिल्याणं झाडांच्या सालीमध्ये असलेल्या भेगा किंवा फटी भरल्या जातात. याचा फायदा असा होतो की, कीटक, किडे वा बुरशी झाडाकडे आकर्षित होत नाहीत, कारण रंगाच्या सहाय्याने सालीमधील भेगा किंवा फटी भरल्या गेल्याने त्यांना वाढीस पूरक अशी जागा मिळत नाही. त्याचा अंतिम फायदा असा होतो की कीटक, किडे आणि बुरशीपासून झाडाचं रक्षण होते. परिणामी,  रंग दिल्यामुळे झाडांचे आयुष्य देखील वाढते. दुसरं महत्वाचं म्हणजे, झाडांना रंग दिल्यामुळे झाडाच्या सुरक्षेत सुधार होतो. याशिवाय संबंधित झाड हे वन विभागाच्या देखरेखीखाली आहे याचाही संकेत यातून मिळतो. त्यामुळे त्यांची छाटणी केली जात नाही. काही ठिकाणी फक्त पांढर्‍या रंगाचा उपयोग झाडांना रंगविण्यासाठी केला जातो, तर बर्‍याच ठिकाणी लाल आणि निळा रंग देखील वापरला जातो. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यालगतची झाडेदेखील पांढर्‍या रंगानी रंगवलेली असतात, जेणेकरून रात्रीच्या अंधारात ही झाडे त्यांच्या रंगांमुळे गाडीच्या प्रकाशाने सहज उठून दिसू शकतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!