Just another WordPress site

Who will be the Women State President ? रुपाली चाकणकर यांच्यानंतर कोण असेल राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्षा? या ‘४’ नावांचीच होते जोरदार चर्चा

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अपक्षेप्रमाणे त्यांनी राजकीय पदाचा राजीनामा दिला. त्या पार्श्वभूमीवर आता रुपाली चाकणकर यांच्या जागी पक्षातील कोणाला महिला प्रदेशाध्यपदी काम करण्याची संधी  मिळते, याची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात चर्चा रंगलीये. गेल्या विधानसभा निवडणुकी आधी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला.  यानंतर रिकामे झालेले महिला प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. चित्रा वाघ यांच्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची माळ रुपाली चाकणकर यांच्या गळ्यात पडली.  पुढं त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्ष या अर्धन्यायिक पदावर नियुक्ती झाली. राज्य महिला आयोगाची सुत्र हाती घेताच अनेक मोठी प्रकरणं हाताळली. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्या राजकीय पद सोडणार का? याकडे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून त्या राजीनामा देणार अशी चर्चा होती.  अशातच  काल त्यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत आपला महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे आता महिला प्रदेशाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार ? याचीच चर्चा सुरुये. त्या पार्श्वभूमीवर महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी चार  महिला नेत्यांची नावं आघाडीवर आहेत.


हायलाईट्स

१. रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

२. प्रदेशाध्यक्ष पाटील, शरद पवारांकडे पाठवला राजीनामा

३. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी ४ नावांची चर्चा

४. रुपाली पाटील ठोंबरे यांचं पारडे जड राहण्याची शक्यता

रुपाली पाटील ठोंबरे

मधल्या काळात महिला प्रदेशाध्यक्ष ही जबाबदारी सक्षमपणे सांभाळू शकणारी महिला कार्यकर्ती पक्षात दिसत नव्हती.  दरम्यान, अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या पुण्यातील रुपाली पाटील ठोंबरे यांचे नाव यासाठी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. मनसेच्या पुण्यातील फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी मनसेत असतांना पुण्याच्या महिला आघाडी शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. त्या काळात त्यांनी अतिशय आक्रमकपणे आपलं काम पार पाडलं.  त्या आक्रमक आणि लढवय्या चेहरा म्हणून  ओळखल्या जातात.  त्यांनी केलेलं आंदोलनं असो की,  सामाजिक कार्य असो. त्याचं काम लक्षवेधी आहे. झाशीची राणी प्रतिष्ठान या संस्थेमार्फत त्यांनी सामाजिक कार्य सुरू केलं होतं. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचं विशेष काम केलं. त्यांना राजकीय पदावर काम करण्याचा आणि महिला आघाडीच्या कामाचा अनुभव असल्यामुळे राष्ट्रवादी रुपाली पाटील यांच्या गळ्यात महिला प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकू शकते.

हेमा पिंपळे

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा हेमा पिंपळे  यांच्याही नावाची महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा आहे.कर्नाटकमध्ये हिजाबवरुन  चाललेल्या राजकारणाचा निषेध करत, हिजाबच्या समर्थनार्थ बीडमध्ये  हेमा पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत हिंदू महिलांनीही हिजाब परिधान करुन मुस्लिम महिलांना पाठिंबा दिला होता. हेमा पिंगळे या २० वर्षांपासून बीडच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचा राजकारणातील अनुभव पाहता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकते.

आदिती तटकरे

सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे सध्या राजकारणात स्थिरावल्या.  अनेक खात्यांचा भार त्या सांभाळत असून या खात्यांना त्या न्यायही देत आहेत. कोकणात आलेलं निसर्ग वादळ असो, तौक्ते वादळ असो. प्रत्येक ठिकाणी हजर राहून त्यांनी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली. त्यामुळे अभ्यासू नेत्या  म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जातं.  सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी तरुणींना राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत आदिती यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस जॉईन केली. तेव्हापासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून काम करत आहेत. आदिती तटकरे यांनी युवती कॉंग्रेसचं मोठं काम केलं. त्यामुळे आता महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही पक्ष आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सक्षणा सलगर

सक्षणा सलगर यांच्या कामाची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची २०१६ मध्ये राज्याची स्टार प्रचारक म्हणून निवड केली होती. शिवाय त्या पक्षाच्या प्रवक्‍त्या म्हणूनही काम करत आहेत. राष्ट्रवादीच्या युवती संघटनेच्या स्थापनेपासून सक्षणा सलगर या संघटनेमध्ये काम करत आहेत. सक्षणा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा आहेत. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीची महिला संघटना सक्षम करायची असेल तर उस्मानाबादच्या सक्षणा सलगर यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादी देऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!