Just another WordPress site

नाकावाटे दिल्या जाणाऱ्या व्हॅक्सिनची किंमत काय, किती टक्के जीएसटी बसणार?; जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्लीः भारत बायोटेकने तयार केलेल्या नाकावाटे देण्याच्या करोना प्रतिबंधक लशीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या, १८ वर्षे वयोगटावरील नागरिकांना ही लस बूस्टर मात्रा म्हणूनही घेता येणार आहे. आता केंद्र सरकारने या लशीची किंमतही जाहीर केली आहे.

भारत बायोटेकची इन्ट्रानेजल व्हॅक्सिन iNCOVaCC ला मागील आठवड्यात केंद्र सरकारने परवानगी दिली. कोविन अॅपवर ही लसमात्रा उपलब्ध होणार असून तूर्त खासगी रुग्णालयांमध्ये घेता येणार आहे. तर राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्येही त्याचा लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे. खासगी रुग्णालयात ही लस ८०० रुपयांना मिळणार आहे. याचबरोबर यावर ५ टक्के जीएसटीदेखील भरावा लागणार आहे.

१८ वर्षांवरील नागरिकांना नाकावाटे ही लस घेता येणार आहे. येत्या एक महिन्याच्या आतच ही लस खालगी रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, खासगी रुग्णालयात ही लस देण्यासाठीचे शुल्क म्हणजेच हॉस्पिटल चार्ज १५० रुपये आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं लशीच्या एका डोसची किंमत १ हजार रुपयांपर्यंत जाईल, अशी शक्यता आहे.

चीनसह इतर देशांमध्ये वाढत असलेल्या करोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने या लशीला दिलेली मान्यता महत्त्वाची मानली जात आहे. बीबीव्ही १५४ या लशीला औषध नियंत्रण संचालनालयाने मर्यादित आणि तातडीच्या वापराला नोव्हेंबरमध्ये मान्यता दिली होती. ‘इन्कोव्हॅक’ ही नाकाववटे दिली जाणारी लस ‘कोविन’वर शुक्रवारपासून उपलब्ध झाली असून खासगी रुग्णालयांतून घेता येईल, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. ‘नाकावाटे घेण्याची लस ही भारताच्या संशोधन आणि उत्पादनाचे आणखी एक उदाहरण आहे. ही लस बूस्टर मात्रा म्हणूनही घेता येऊ शकेल’, असे नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेन’च्या डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितल

नाकावाटे लस घेण्याचे फायदे

नाकावाटे घेण्याच्या या लशीमुळे नाकाच्या वरील भागात प्रतिजैविके तयार होतात व त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखणे व रोगाची बाधा टाळणे शक्य होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!