Just another WordPress site

Hyderabad Gazette : निजाम राजवटीत 1881 मध्ये 16 लाख 58 हजार कुणबी, विश्वास पाटलांचे संशोधन

Vishwas Patil on Hyderabad Gazette : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देण्याची मागणी केली. हैद्राबाद गॅझेटचा (Hyderabad Gazette) उल्लेख करत जरांगेंनी ही मागणी केली. दरम्यान, हैदराबाद गॅझेट नक्की काय आहे? त्यात नेमकं काय होतं? याबाबत साहित्यिक विश्वास पाटी (Vishwas Patil) यांनी काही संशोधन केलं. त्यांच्या संशोधनात सन 1881 मध्ये ब्रिटिश राजवटीत तयार करण्यात आलेल्या हैद्राबाद गॅझेटमध्ये निजाम राजवटीतील 17 जिल्ह्यांत 16 लाख 58 हजार 665 कुणबी असल्याची माहिती नुकतीच समोर आली.

विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल, ‘टीस’ची प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमवरील बंदी मागे 

विश्वास पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सन 1881 च्या गॅझेटमधील आकडेवारी समोर आणली आहे. ते म्हणाले, ब्रिटिश सरकारने जातीनिहाय जनगणना केली होती. 1850 च्या जवळपास हैदराबादचा बिर्टीश रेसिडेंट सर रिचर्ड मिड रिचर्ड मिड यांनी या जनगणनेचं प्रमुख काम पाहिले. त्याच्या आधी Dr. Brabley & Company नावाच्या जगप्रसिद्ध कंपनीने सुद्धा प्रचंड डाटा कलेक्शन केलं होतं. 1884 च्या जुलै महिन्यामध्ये मुंबईहून टाइम्स ऑफ इंडिया प्रेसमधून या बाबतचे औरंगाबाद जिल्ह्याचे म्हणजेच आताच्या औरंगबाद आणि जालना जिल्ह्याचे 877 पानांचे गॅझेटियर प्रसिद्ध केले गेले. शिवाय पुढे संपूर्ण हैदराबाद निजाम प्रशासन बाबत स्वतंत्र असे आणखी काही गॅझेटियर्स 1901 नंतर प्रकाशित करण्यात आली. या गॅझेटनुसार, निजामाच्या अधिपत्याखाली 17 जिल्हे होते. त्यात सध्याच्या मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश होता. या गॅझेटमध्ये जनगणना होतीच, याशिवाय, कोण विवाहित? कोण अविवाहित आणि विधुर यांचाही उल्लेख होता, असं पाटील म्हणाले.

MBBS BDS Admission : एमबीबीएस, बीडीएसचा दुसरा कॅप राउंड कधीपासून? जाणून घ्या प्रवेश वेळापत्रक 

1881 च्या आकडेवारीनुसार किती कुणबी होते?
पाटील यांनी सांगितलं की, 1884 च्या जनगणनेनुसार यामध्ये हैद्राबाद, तेलंगणा आणि मराठवाडा ह्या तिन्ही विभागांची लोकसंख्या एकत्रित आहे. ही एकूण लोकसंख्या 98 लाख 45 हजार 594 होती. यात ब्राह्मण- 2 लाख 59 हजार 147, राजपूत -49 हजार 843, बैरागी – 5 हजार 57 , बेरड –1 लाख 19 हजार 161, भोई—92 हजार 170, चांभार –4 लाख 47 हजार 312, दर्जी( शिंपी ) – 30,937, धनगर – 4 लाख 82 हजार 35, गवंडी – 30,039, गवळी – 2 लाख 12 हजार 608, गोसावी – 21395, जोगी – 4371, लोहार 56,128 , गुजराती – 3544, लिंगायत – 97 हजार 836, माळी –83 हजार 806, कामाठी – 1लाख 94 हजार 284, कोंष्टी – 79,142, कोळी –2 लाख 13 हजार 966 , कुणबी-16 लाख 58 हजार 665 , मराठा –3 लाख 69 हजार 636 , मांग -3 लाख 15 हजार 732, महार – 8 लाख 6 हजर 653, मानभाव – 2627, कुंभार –90, 835 , महाली -1 लाख 2213 , मारवाडी—42009, सोनार – 88 हजार 769 , तेलंगे –3 लाख 27338 , तेली – 67,564 , वडार – 54 हजार 833, बंजारा – 6120 , बनिए – 3 लाख 92184, भिल्ल –8470 , गोंड – 39513 , कोय्या – 45300’ लमाणी – 85204, पारधी – 2114

छत्रपती संभाजीनगरची लोकसंख्या किती होती?
पाटील म्हणाले, औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या 7 लाख 30 हजार 380 होती. यात मराठा कुणबींची संख्या 2 लाख 57 हजार होती. बंजारा – 8,900 कोळी- 7000 , मराठा होळकर – 5,800 , माळी-18,600, महार – 66,800, मांग व चांभार – 21,500, धनगर- 31,931, ब्राह्मण 28,491. वाणी- 4,600 मारवाडी- 7,800 , ख्रिश्चन 2,673 , मुस्लिम- 78,687 इतके होते.

1881 हैद्राबाद गॅझेटनुसार, नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या 6 लाख 36 हजार होती. नांदेड जिल्ह्यात उस्माननगर, हतगाव, दहिसर, बेलोरी, देगलूर कंधार, नांदेड हे तालुके होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!