Just another WordPress site

Vilasrao Deshmukh : हॅलो… मी विलासराव देशमुख बोलतोय…; विलासराव देशमुखांचा ‘तो’ मोबाईल नंबर आजही सुरु

मुंबई –  महाराष्ट्राचे अनेक माजी मुख्यमंत्री फर्डे वक्ते म्हणुन सुपरिचित आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे स्व. विलासराव देशमुख. त्यांची सभा म्हणजे राजकीय मेजवानीच असायची. आज त्यांची जयंती. मात्र आज ते आपल्यात नसले तरी मात्र विलासराव यांच्या पर्सनल मोबाईल नंबरवर फोन केल्यावर आज देखील कॉल उचलला जातो.  विश्वास नसेल तर ९८२११२५००० या नंबरवर फोन करू शकता. एवढेच नाही तर त्यांचा आवाज ऐकण्यासाठी धीरज देशमुख हे देखील या नंबरवर फोन करतात, हे वास्तव आहे.

विलासराव देशमुख कितीही कामात असले तरीही त्यांना आलेले फोन ते स्वतः उचलायचे. मग तो गावातील कार्यकर्ता असो कि अन्य महत्वाचा व्यक्ती. विलासराव देशमुख प्रत्येकाचा फोन उचलत असत. त्यांना नेहमीच सतत लोकांमध्ये राहणे, त्यांच्याशी संवाद साधणे हे कायमच आवडायचे. त्यामुळेच त्यांनी सर्वांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं होतं. विलासराव यांचा ९८२११२५००० हा मोबाईल नंबर आजही कित्येकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. लातूर मधली आणि आसपासच्या ग्रामीण भागातील अनेक मंडळी विलासराव देशमुख यांना थेट फोन करत संपर्क ठेवत असत. विलासरावांबद्दलचं लोकांच्या मनात असणारं हे प्रेम पाहून त्यांचा हा मोबाईल नंबर आजही सुरु ठेवण्यात आलाय. या नंबरवर तुम्ही कधीही फोन करु शकता. फोन लावल्यानंतर तुमच्याशी विलासराव बोलत नाही पण, त्यांची गाजलेली भाषणे तुम्हाला ऐकायला जरूर मिळतील. राजकीय नेते, मंत्री हे फोनच उचलत नसल्याची अनेकांची ओरड असते. मात्र, विलासराव देशमुख हे अर्ध्या रात्रीही फोन उचलतात हे सर्वांनाच माहिती होते. आणि त्यांची हीच बाब कायम ठेवण्याच्या उद्देशाने त्यांच्या कुटुंबीयांनी आजही त्यांचा मोबाईल नंबर सुरु ठेवला आहे. यामध्ये तंज्ञानाचा वापर करून व्हॉइस ऍक्टिव्हेशन म्हणून चालू ठेवण्यात आला आहे. त्यात केवळ गाजलेली काही मोजकी भाषणे ठेवण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!