Just another WordPress site

वैशाली ठक्करला तिचा एक्स बॉयफ्रेंड द्यायचा त्रास; ‘त्या’ दोघांचीही नावे समोर, वैशालीच्या डायरीतून मोठा खुलासा

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने रविवारी तिच्या इंदौर येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याने संपूर्ण देश हादरला. ती गेले वर्षभर इंदौर याठिकाणी राहत होती. तिच्या राहत्या घरी तिने आत्महत्या केली. वैशालीचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. तिने वयाच्या २९ व्या वर्षी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणात तेजाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून एक नोटही जप्त करण्यात आली.

 

महत्वाच्या बाबी

१. अभिनेत्री वैशाली ठक्करची आपल्या राहत्या घरी आत्महत्या
२. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी जीवन संपवण्याचा निर्णय
३. एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळली होती वैशाली ठक्कर
४. वैशालीच्या आत्महत्येच्या वृत्ताने मनोरंजन विश्वात खळबळ

 

वैशालीच्या आत्महत्येनंतर त्याठिकाणी जी सुसाइड नोट आढळली, त्यातून महत्त्वाची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार वैशाली ठक्कर अनेक दिवसांपासून तणावाखाली होती. यासंदर्भातील उल्लेख तिथे सापडलेल्या नोटमध्येही आहे. तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला त्रास देत असल्याचेही या चिठ्ठीत सांगितले. तिचा एक्स बॉयफ्रेंड कोण होता, त्याचे नाव हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

दरम्यान, मागच्या वर्षी एप्रिलमध्ये वैशालीने चाहत्यांना तिच्या साखरपुड्याची माहिती दिली होती. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर रोका समारंभाचा एक व्हिडीओ शेअर केला होता आणि याचबरोबर होणारा नवरा डॉ. अभिनंदन सिंहच्या नावाच्या खुलासा केला होता. या कार्यक्रमात फक्त वैशाली आणि तिच्या पतीचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. अभिनंदन हा केनियामधील डेंटल सर्जन होता. त्यानंतर जवळपास महिन्याभरातच वैशालीने जून महिन्यात होणारं तिचं लग्न रद्द झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. तिने काही काळानंतर तिचा रोका सेरेमनीचा व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलीट केला.

दरम्यान, वैशालीने काल इंदौर इथल्या साईबाग कॉलनीत रविवारी आत्महत्या केली. फॅनला दोर अडकवून गळफास घेत तिने आत्महत्या केली.

तिच्या डायरीतले अखेरचे शब्द वाचताना कुणालाही धक्का बसेल. वैशालीने डायरीत आई आणि वडिलांची माफी मागितली आहे. मी एक चांगली मुलगी होऊ शकले नाही, मला माफ करा.. अशा आशयाचा मजकूर लिहिलाय. तर याच मजकुरात राहुल नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख केलाय. ही व्यक्ती तिचा शेजारी असल्याचं म्हटलं जातंय. राहुल आणि त्याची पत्नी दिशाचंही नाव आहे. अडीच महिने या दोघांनी तिला मेंटली टॉर्चर केल्याचं डायरीत म्हटलंय. या दोघांनाही शिक्षा देण्याची विनंती वैशालीने केली. प्लीज राहुल आणि त्याच्या पत्नीला शिक्षा मिळवून द्या, नाही तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही…

वैशालीच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली. मृत अभिनेत्रीकडून पोलिसांना एक वैयक्तिक डायरीही सापडली असून, त्यातून तिने आत्महत्या का केली त्याच कारण समजत आहे. वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणी पोलीस कमीशनर हरी नारायण मिश्र यांनी माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की, सुसाइड नोटमध्ये एक्स बॉयफ्रेंडसह अभिनेत्रीच्या शेजाऱ्याचेही नाव आहे. रात्री उशीरा पोलिसांनी राहुल आणि दिशाला ताब्यात घेतलं. राहुल आणि त्याच्या पत्नीवर वैशालीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच आरोप आहे. वैशालीने सहा दिवसांपूर्वी सोशल मीडिया अकाउंटवरून एक रील शेअर केली होती. त्यात फक्त सिलिंग फॅन दिसत होता. त्यातूनही तिने आत्महत्येचा संकेत दिल्याचं म्हटलं जातंय. वैशाली ठक्करने ‘ससुराल सिमर का’मध्ये अंजली भारद्वाज ही भूमिका साकारली होती. याशिवाय तिने ‘सुपर सिस्टर्स’, ‘विष या अमृत: सितारा’, ‘मनमोहिनी २’ या मालिकांमध्ये काम केलं होतं. वैशाली ठक्करने स्टार प्लसवरील सर्वाधिक काळ सुरू असलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने २०१५ ते २०१६ या काळात संजना ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘ये है आशिकी’मध्येही दिसली होती. ‘रक्षाबंधन’ ही तिची अखेरची मालिका होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!