Just another WordPress site

Underworld : अंडरवर्ल्डमध्ये मर्डर करण्यासाठी सुपारी शब्दाचा वापर का केला जातो? कुठून आणि कशी झाली सुरुवात?

तुमच्यापैकी अनेकांना चित्रपट पहायची आवड असेल. मग अमुक एखाद्याने तमुक एखाद्याला मारण्यासाठी सुपारी दिली किंवा घेतली, असे डायलॉग चित्रपटात तुम्ही नक्कीच ऐकले  असतील. पण, या सगळ्या गैरव्यवहार आणि बेकायदेशीर कामांना सुपारी असं का म्हटल्या जातं. खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुपारीचं नाव अंडरवर्ल्डमध्ये इतकं नकारात्मक कसं वापरलं जाऊ लागलं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? चला तर याच विषयी जाणून घेऊया.


हायलाईट्स

१. अंडरवर्ल्डमध्ये सुपारी शब्दाचा वापर सर्रासपणे हत्येसाठी केला जातो

२. सुपारीच्या गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांबाबत अनेक दावे 

३. सुपारी हा शब्द वापरण्यामागे जुना इतिहास देखील आहे.

४. डील पक्की होते तेव्हा ‘कामाची सुपारी आली आहे’ असं म्हटलं जातं


मुंबईत ६० आणि ७०च्या दशकात जेव्हा हाजी मस्तान आणि करीम लालाची दहशत इथल्या गल्लीबोळांमधून वाढत वाढत थेट आंतरराष्ट्रीय रॅकेटपर्यंत पोहोचली, तिथेच या ‘सुपारी’ची पाळंमुळं असल्याचं उपलब्ध दस्तऐवज आणि दंतकथांवरून दिसून येतं. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात विड्याच्या पानासोबत सुपारी खाल्ली जाते. मात्र, हाच सुपारी शब्द कालांतराने एखाद्याला जीवे मारण्याचं काम देण्यासाठी वापरला जाऊ लागला.  खरं तर या सुपारी शब्दामागे मोठी कहाणी आहे.  सुपारीच्या गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांबाबत अनेक दावे केले जातात. सुपारी या शब्दाचा अर्थ फक्त कॉन्ट्रॅक्ट किलिंग असा होतं नाही. तर याशिवाय सुपारी या शब्दाचा अन्य ठिकाणीही अनेकदा वापर केला जातो. ज्यात एखादी बोलणी जर पक्की झाली असेल तर त्या वेळी ऍडव्हान्स किंवा टोकण म्हणून सुद्धा या शब्दाचा उल्लेख केला जातो. एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात कोणत्याही पाहुण्याला आमंत्रित करण्यासाठी पान आणि सुपारी दिली जाते. यासोबतच सुपारी हा शब्द कोणत्याही डील किंवा कॉन्ट्रॅक्टसाठी वापरला जातो. जेव्हा एखाद्या गोष्टीवर सहमती होते किंवा डील पक्की होते तेव्हा ‘कामाची सुपारी आली आहे’ असं मराठीत म्हटलं जातं. याचा अर्थ आम्हाला कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं असा आहे. त्या काळी म्हणजे, ७०च्या दशकात, मुंबईत पोस्टिंगवर असलेले बहुतांश पोलीस हे राज्याच्या ग्रामीण भागातून आले होते. अमुक गुंडानं अमुक व्यक्तीला मारण्याची सुपारी दिली, असं बोलायला या पोलीस कर्मचाऱ्यांनी आधी सुरुवात केली. याच काळात अंडरवर्ल्डशी पोलिसांचा अनेक चौकशा आणि प्रकरणांमध्ये संबंध आल्यानंतर हा शब्द अंडरवर्ल्डनं परवलीचा करून टाकला. त्यामुळे गुन्हेगारी चित्रपटांमध्ये देखील सुपारी हा शब्द जास्त वापरला जाऊ लागला… चित्रपटांमध्ये जेव्हा अंडरवर्ल्डशी संबंधित एखादी घटना चित्रित केली जाते, तेव्हा या शब्दाचा प्रामुख्याने उच्चार आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मिळतो.  याचा अर्थ एखाद्या व्यक्तीचा मर्डर करण्यासाठी आपल्याला काम मिळाले आहे, असा अर्थ तिथं लावला जातो. सुपारी हा शब्द वापरण्यामागे जुना इतिहासदेखील आहे. ‘Dongri to Dubai: Six Decades of the Mumbai Mafia’ या पुस्तकाचे लेखक एस. हुसैन झैदी यांनी पुस्तकात सुपारी शब्द वापरण्यामागचा इतिहास सांगितला. या पुस्तकामध्ये माहेमी जमातीचे प्रमुख भीम यांच्या परंपरेमुळे सुपारी हा शब्द प्रचलित झाल्याचे सांगण्यात आले.  पुस्तकानुसार भीम यांच्या समोर जेव्हा केव्हा कठीण काम असायचे, तेव्हा ते योद्ध्यांची सभा बोलावत आणि त्यानंतर ताटलीमध्ये सुपारी किंवा पान ठेवत असत.  जो कोणी ही पान किंवा सुपारी उचलायचा, त्याला ते काम करावं लागायचं. यावरून आपल्या लक्षात येईल की, पान-सुपारी देऊन  कॉन्ट्रॅक्ट किंवा डील स्वीकारली जायची. यानंतरच सुपारी हा शब्द व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरण्यात येऊ लागला. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात गावातल्या लोकांना लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिकेच्या ऐवजी पान आणि सुपारी दिली जात असे. पण हे सगळं असलं, तरी अंडरवर्ल्डमधल्या ‘सुपारी’नं या सुपारीचा पूर्ण अर्थच बदलून टाकला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!