Just another WordPress site

देशात दोन राष्ट्रपिता! गांधी जुन्या तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता; अमृता फडणवीसांचं वादग्रस्त वक्तव्य

नागपूर : राज्यात महापुरुषांवरील वादग्रस्त विधानाची मालिका संपण्याची चिन्ह काही दिसत नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे विधान अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागपूर येथे काल अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे अभिरूप न्यायालयायाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस या प्रमुख पाहुण्या होत्या. या न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून अ‍ॅड. कुमकुम सिरपूरकर यांनी तर वकील म्हणून अजेय गंपावार यांनी काम पहिले. संस्थेच्या प्रथम अध्यक्ष ताराबाई शास्त्री यांच्या स्मृतिनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीस यांनी मोदी देशाचे राष्ट्रपिता असल्याचे सांगत त्यांना आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्याचा आरोप वकिलांकडून अभिरूप न्यायालयात अमृता फडणवीस यांच्यावर करण्यात आला. मोदीजी राष्ट्रपिता, तर महात्मा गांधी कोण? असा प्रश्‍न त्यांना करण्यात आला. तेव्हा ‘आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे आणि नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत’ असा खुलासा जबाब नोंदवताना अमृता फडणवीस यांनी केला. त्यांच्या वक्तव्याकडे नेहमीच महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. त्यांच्या अनेक वक्तव्यांवरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलंय. मात्र मी कुणालाच घाबरत नाही. सामान्य नागरिक माझ्यावर टीका करत नाहीत. . राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते कल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही आणि घाबरतही नाही. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणे मला महत्वाचे वाटत नाही, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!