Just another WordPress site

Ahmednagar : प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मिळेना विद्यावेतन, जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार; पाच महिन्यांपासून प्रतीक्षा

नगर : जिल्हा रुग्णालयातून (Ahmednagar District Hospital) बोगस प्रमाणपत्र दिल्याने रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला असताना त्यातच गेल्या पाच महिन्यांपासून प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यावेतनाच्या प्रतिक्षेत आहेत. या महिन्यात तरी विद्यावेतन मिळावी, अशी अपेक्षा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून (Trainee Doctor) होत आहे.

Vidhansabha Election : राज्यात काँग्रेसला ‘अच्छे दिन’, विधानसभेसाठी तब्बल १४०० जण इच्छुक 

राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी महाविद्यालयातील आंतरवासिता प्रशिक्षणार्थीच्या विद्यावेतनात वाढ करून तसेच परदेशातून एमबीबीएस वैद्यकीय पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीत १८ हजार रुपये विद्यावेतन देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्यावतीने शासन निर्णय काढण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून नगर जिल्हा रुग्णालयात सुमारे २५ प्रशिक्षणार्थी डॉक्टर सध्या कार्यरत होते. त्यात आज अखेर १४ प्रशिक्षणार्थी डॉक्टर कार्यरत आहेत. एका डॉक्टरला १८ हजार रुपये असे विद्यावेतन दिले जाते. २५ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मिळून एकूण महिन्याला ४ लाख ५० हजार तर असे पाच महिन्याचे २२ लाख ५० हजार रुपये विद्यावेतन रखडले आहे. त्यामुळे डॉक्टरांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

केजरीवाल आज देणार सीएमपदाचा राजीनामा ? उपराज्यपालांना भेटण्याची वेळ ठरली, आपच्या बैठकीत ठरणार नवा मुख्यमंत्री 

सप्टेंबर व ऑक्टोबर महिना हा सणांचा असल्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तत्काळ विद्यावेतन अदा करावे, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून होत आहे. दरम्यान, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक संजय घोगरे यांना निवेदन दिले होते. मात्र, यावर अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर आहे.

जिल्हा रुग्णालयात बीएचएमएस डॉक्टर प्रशिक्षणार्थी आहेत. मात्र एमबीबीएस प्रशिक्षणार्थी डॉक्टर नाहीत. त्यामुळे प्रशिक्षणार्थी बीएचएमएस डॉक्टरांना विद्यावेतन शासनाकडून देण्यात येत नाही.
संजय घोगरे,
शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय अ.नगर.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!