Just another WordPress site

देशात जीवघेण्या ‘लम्पी’ आजाराचा धोका वाढला, जनावरांवर संकट आल्याने पशुपालक चितेंत

भारतात कोरोना विषाणू आणि मंकीपॉक्सनंतर आणखी एका रोगाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. हा आजार मुख्य: प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. ‘लंपी स्किन डिसीज’ असे या आजाराचे नाव असून त्वचेशी संबंधित असणाऱ्या या रोगामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात गुरांचा मृत्यू झाला.

 

महत्वाच्या बाबी

१. देशभरात ७० हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे
२. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये लम्पी आजार प्रादूर्भाव
३. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये लम्पीचा प्रसार वेगाने
४. केंद्राने लम्पीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा

 

पशुपालन हे देशातील एका मोठ्या वर्गाचे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, त्यावर लम्पी नावाच्या संसर्गजन्य रोगाने ग्रहण लावले. राजस्थान आणि आसपासच्या भागात धुमाकूळ घालणाऱ्या या आजाराने आता देशाची राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये थैमान घातले. शेकडो पशुंना लम्पीची लागण झाली. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणासह डझनभराहून अधिक राज्यांत लम्पीचा शिरकाव झालाय. पशुपालन विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील १९७ जिल्ह्यांमधील पशुधन लम्पीनं बाधित झाले आहे. लम्पीची लागण झालेल्या पशुंची संख्या २० लाखांहून अधिक असून सुमारे ८५ हजार गुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यात एकठ्या गुजरातमध्ये आत्तापर्यंत सुमारे एक हजारापेक्षा गुरांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर राजस्थानमध्ये ३ हजार पशूंचा मृत्यू झाला असून दीड-दोन लाखांहून अधिक जनावरे संसर्गाचे बळी ठरले. हा आकडा पूर्णपणे अचूक नाही. राज्यातील जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या सर्वेक्षणात मृत जनावरांच्या संख्येत सातत्याने वाढ होतेय. महाराष्ट्रातही या आजाराने थैमान घातले. या आजाराने राज्य सरकार आणि शेतकऱ्यांची झोप उडवली. अनेक जनावरांना लम्पी रोगाने हैराण केले.
राज्यात हा आजार दिवसेंदिवस बळावत असून हळूहळू राज्यातील गुरांना तो आपल्या विळक्यात घेत आहे. एकापाठोपाठ एक अनेक जिल्ह्यांतील गुरे ही लंम्पी आजाराचीबळी ठरत असल्याचे चित्र आहे. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात दिडशे पेक्षा अधिक गुरांचा मृत्यू झाला असून २५ जिल्ह्यांमध्ये लम्पी व्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिली. दरम्यान, या आजाराला विळखा घालण्यासाठी राज्य पातळीवरील यंत्रणा सतर्क झाल्याचं दिसंत. लम्पीच्या नियंत्रणासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज झाली. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना केली. शिवाय, लम्पीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी जनावरांच्या लसीकरणासाठी ५० लाख लसींची ऑर्डर देण्यात आली. राज्यातील ज्या भागांत जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण मोठ्याप्रमाणावर झाली आहे, त्याठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली. वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली. लम्पी आजाराचा प्रभाव आणखी वाढू नये, यासाठी प्रत्येक राज्य आपापल्या परिनं प्रयत्न करतंय. गावपातळीवर या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी, तसंच जनावरांना वेगळं ठेवण्यासाठी सर्वतोपरी उपयायोजना करा, असा सल्ला केंद्र सरकारने राज्यांना दिलाय खरा. मात्र, प्रत्यक्षात केंद्र सरकार याबाबत सतर्क नसल्याचं दिसतं. या गुरांच्या गंभीर आजाराकडे केंद्र सरकारनं दुर्लक्ष केल्यास दूग्ध व्यवसायावर याचा मोठा गंभीर परिणाम होऊ शकतो. परिणामी ग्रामीन अर्थव्यवस्थेला डबघाईला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आजाराकडे प्रत्येक राज्याच्या सरकारसह केंद्र सरकारने गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे, या आजाराचा विम्यामध्ये अंतर्भाव नसल्याने शासनाने विमा कंपन्यांशी बोलून याचा अंतर्भाव करून दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
याशिवाय, महाराष्ट्रात ठराविक जिल्ह्यात गाईंना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले आहे. या आजाराविषयी लोकांमध्ये गैरसमज मोठ्या प्रमाणावर असल्याने ते दूर करण्यासाठी जनजागृती करायला हवी. या आजाराविषयी काय खबरदारी घ्यावी याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार केंद्र सरकारने करावा. या आजारात जनावरे दगावण्याची शक्यता असल्यानं पशुपालक चिंतेत आहेत. बाजारांमध्ये जनावरांच्या किंमती गगनाला भिडल्या असून, या आजारात जनावरे दगावल्यास पशुपालकांना हा मोठा फटका बसणार आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकार सारखाचा या आजाराच्या निर्मूलनासाठी पुढाकार घ्यावा. तरच बळीराजा या आजारातून सावरू शकेल.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!