Just another WordPress site

Sudha Bhardwaj । भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातल्या सुधा भारद्वाज यांना जामीन; कोण आहेत सुधा भारद्वाज?

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला. सुधा भारद्वाज यांनी कोर्टाकडे डिफॉल्ट बेलसाठी याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने आज निर्णय देत जामीन मंजूर केला. हायकोर्टाने सुधा भारद्वाज यांना ८ डिसेंबरला विशेष न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, सुधा भारद्वाज कोण आहेत? त्यांना अटक का करण्यात आली होती? याविषयी जाणून घेऊया. 



हायलाईट्स

१. सुधा भारद्वाज यांना मोठा दिलासा

२. मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

३. ८ जणांचा जामीन कोर्टानं फेटाळला

४. ८ डिसेंबरला विशेष न्यायालयासमोर हजर


२०१८ मध्ये झालेल्या कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणी सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एन. जे. जमादार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर जामीन मंजूर केला. तर अन्य आठ जणांचे जामिनाचे अर्ज फेटाळले.  पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होता. या हिंसाचाराच्या एक दिवस आधी  म्हणजे ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील वक्तव्यं कारणीभूत होती, अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. या एल्गार परिषदे मागे माओवादी संघटनांचा हात होता असं म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत, या संशयावरून पोलिसांनी देशभरातल्या अनेक भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली होती. सुधा भारद्वाज यांच्यावर शहरी नक्षली असल्याचा ठपका ठेवत त्यांना  ६ जून २०१८ ला अटक केली होती.

सुधा भारद्वाज या अमेरिकेत जन्मल्या होत्या. सुधा यांनी आपलं प्राथमिक शिक्षण इंग्लंडमध्येपूर्ण केलं. आणि ११ वर्षांच्या असतानाच त्या भारतात आल्या होत्या. सुधा भारद्वाज यांची आई कृष्णा भारद्वाज या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या डीन होत्या. सुधा यांनी कानपूरच्या IIT मधून गणिताची पदवी घेतली. त्यांना परदेशात परतून पुढचं शिक्षण घेण्याची संधी होती, मात्र, कॉलेजच्या काळात सुध्या ह्या दुर्गम भागांतील अनेक  ठिकाणी फिरल्या होत्या. याच दरम्यान १९८६ साली त्यांची भेट छत्तीसगडमधल्या जनमुक्ती मोर्चाचे नेते शंकर गुहा नियोगी यांच्याशी झाली होती. त्यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन, सुधा भारद्वाज या डाव्या चळवळीशी जोडल्या गेल्या. तिथेच कंत्राटी कामगारांच्या संघर्षात त्या सामिल झाल्या आणि तेव्हापासून आदिवासी लोकांसाठी काम करायचं ठरवलं. मागील गेल्या ३०  वर्षांपासून त्या ट्रेड युनियनच्या नेत्या आहेत. याशिवाय, मानवाधिकार चळवळीतल्याही त्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. २००० साली रायपूरच्या पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठातून सुधा भारद्वाज यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. २००७ पासून छत्तीसगड हायकोर्टात वकिली सुरु केली. छत्तीसगडमधील नॅशनल लॉ विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम करत होत्या. दरम्यान, भारद्वाज यांना ८  डिसेंबरला विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून विशेष न्यायालयाच्या चौकशीत काय समोर येतं, हेचं पाहणं महत्वाचं आहे.

हेही वाचा : खासदारांचं निलंबन कधी आणि कोणत्या कारणांमुळे होतं? कोणत्या नियमांच्या आधारे होतं निलंबन?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!