Just another WordPress site

अजबच! ‘इथे’ जिवंतपणीच लोक करतात आपल्या अंत्यसंस्कारांची तयारी, आवडीने करतात मृत्यूनंतर लागणाऱ्या वस्तूंची शॉपिंग

जेव्हा कोणी मृत्यू पावतं तेव्हा त्याच्या अंत्यसंस्कारासाठी वस्तू खरेदी केल्या जातात. परंतु तुम्ही कधी ऐकले ही नसेल की, लोक जिवंतपणीचं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वस्तू खरेदी करत आहे… होय, असा एक देश आहे जिथे लोक मृत्यू येण्यापूर्वीच कबर, कपडे आणि कफन खरेदी करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यासाठी एक महोत्सव देखील आयोजित केला जातो. जो शुकात्सू उत्सव म्हणून ओळखला जातो. चला याच विषयी जाणून घेऊ.

कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर लोकांना फार दुखं होतं. ज्यामुळे लोक बऱ्याचदा त्या दु:खात असतात. ज्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना वेळ लागतो. अनेक लोक तर अनेक महिने स्वत:ला घरात कोंडून ठेवतात, तसेच आपल्या आयुष्यावर बंधनं आणतात. मात्र, जीवन आणि मरण हे देवाच्या हातात आहे असे म्हणतात. आपल्या देशात, कोणत्याही घरात असे अनुचित प्रकार घडले की कुटुंब आणि मित्र विधींसाठी खरेदी करतात, मात्र, जपान असा देश आहे जिथं जिवंत लोक त्यांच्या मृत्यूसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू आधीच खरेदी करतात. लोक जगत असताना स्वतःला लागणाऱ्या सामानांची खरेदी तर करत असतात. पण स्वत:च्या मृत्यूनंतर लागणारे सामान खरेदी करणं हे जरा ऐकायला विचित्रच वाटतं. पण हे खरंय. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यासाठी जपानमध्ये शुकात्सू फेस्टिव्हल नावाने एक उत्सव आयोजित केला जातो, ज्यामध्ये लोक केवळ त्यांच्या मृत्यूबद्दल बोलत नाहीत तर त्यासाठी पूर्ण व्यवस्था देखील करतात. या फेस्टिव्हलमध्ये लोक अंत्यसंस्कारात वापरल्या जाणार्‍या वस्तू आधीच विकत घेतात. त्यात त्यांच्या मृत्यूनंतर कबरीसाठी जमीन, कपडे आणि कफन असे लागणारे साहित्य आधीच खरेदी करून ठेवतात. राजधानी टोकियोमध्ये अंत्यसंस्कार व्यापार मेळा आयोजित केला जातो, जिथे लोक त्यांच्या मृत्यूनंतर वापरल्या जाणार्‍या वस्तू खरेदी करण्यासाठी येतात. हा उत्सव दरवर्षी १६ डिसेंबर रोजी होतो आणि यामध्ये लोकांना त्यांच्या मृत्यू आणि अंत्यसंस्काराची योग्य तयारी करण्यास शिकवले जाते. उत्सवाला येणारे लोक त्यांच्या मृत्यूनंतर परिधान केले जातील असा पोशाख निवडतात आणि फुलांनी भरलेल्या शवपेटीची रचना आणि आकार देखील निवडतात. त्यामध्ये पडून चित्रासाठी पोज देखील देतात. एवढेच नाही तर लोक स्मशानभूमीत या शवपेटीसाठी जमिनीचा तुकडा देखील खरेदी करतात.

खरंतर मृत्यू हा असा विषय आहे ज्याचा लोक फारसा विचार करत नाहीत. तर मृत्यूबद्दल सण साजरा करणे ही एक अतिशय विचित्र कल्पना आहे. खरंतर आपल्याला मृत्यूच येऊ नये असं बरंच लोक विचार करतात. मात्र, टोकियोमधील शुकात्सू उत्सव लोकांना मृत्यूची तयारी कशी करावी हे शिकवते. या व्यवसायाला ‘एडिंग इंडस्ट्री’ म्हणतात. मृत्यूनंतर काय होते आणि ते गेल्यानंतर उरलेल्यांचे काय होईल याची लोकांना जाणीव करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो. जपानमध्ये लोक अशा प्रकारे शेवटच्या प्रवासाची तयारी करताना पाहून जग थक्क झाले आहे. हा सण मृत्यू आणि अंत्यसंस्काराशी संबंधित असला तरी केवळ वृद्धच नाही तर तरुणही मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि या उत्सवात तरुणाईही ज्येष्ठांप्रमाणेच रस दाखवतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!