Just another WordPress site

Statue Of Libiry Book : अमेरिकेत १३६ वर्षांपासून उभ्या असलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या हातातलं ते पुस्तक कोणतं?

अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हि त्यांच्यासाठी स्वतंत्रता इतिहासाची आठवण म्हणून ओळखल्या जाते. गेल्या १३६ वर्षापासून हा पुतळा अमेरिकेत मोठ्या मानाने उभा आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे अनेक फोटो तुम्ही आजवर पाहिले असतील किंवा अनेक सिनेमांमध्येही ही विशाल मूर्ती पाहिली असेल. पण, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या हातात नेमकं कोणतं पुस्तक आहे? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? या विषयी आणि  स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्याच्या अन्य बाबींविषयी जाणून घेऊ.

हायलाईट्स

१. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे फ्रान्सने अमेरिकेला दिलेलं गिफ्ट

२. ऑक्टोबर १८८६ ला झालं स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं अनावरण

३. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं एकूण वजन २२५ टन इतकं

४. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी समानतेचे आणि न्यायाचे प्रतीक आहे


स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा अमेरिकेने स्वतः बनवलेला नाहीये. बऱ्याच जणांना असं वाटतं कि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा अमेरिकेचा आहे.  म्हणजे त्यांनी स्वतः बनवून घेतला असावा. मात्र, तसं नाहीये.  स्टॅच्यू ऑफ लिबर्टी १८८६  ला अमेरिकेच्या स्वातंत्र्यानिमित्ताने अमेरिकेसाठी फ्रान्सकडून देण्यात आलेलं एक गिफ्ट होतं. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची निर्मिती फ्रान्स आणि अमेरिका दोन्ही देशांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली होती. यासाठी अमेरिका आणि फ्रान्सच्या सरकारमधे एक करार झाला होता. ज्यानुसार अमेरिकेने या मूर्तीचा पाया उभारला होता तर फ्रान्सने मूर्तीची निर्मिती केली होती. जेव्हा हि मूर्ती तयार होऊन उभी करण्यात आली, त्या वेळी हि लोखंडाची सर्वांत मोठी रचना होती. फ्रान्सकडून अमेरिकेला भेट देण्यात आलेल्या या तांब्याच्या मूर्तीचं डिझाइन फ्रान्सचे मूर्तिकार फ्रेडरिक ऑगस्ट बार्थोल्दी यांनी तयार केलं होतं. तर ही मूर्ती गुस्ताव एफिलने तयार केली होती. २८ ऑक्टोबर १८८६ ला तत्कालीन राष्ट्रपती ग्रोवर क्लीवलॅंड यांनी हजारो लोकांसमोर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं अनावरण केलं होतं. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं एकूण वजन २२५ टन इतकं आहे. १९८६ मध्ये डागडुजी करताना नव्या मशालीला २४ कॅरेट सोन्याचा मुलामा लावण्यात आला होता. या मूर्तीच्या मुकूटावर ७ किरण आहेत. जे जगातल्या ७ महाद्वीपांचं प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक किरणांची लांबी ९ फूट आहे आणि त्यांचं वजन १५० पाउंड आहे.  जर एखाद्या व्यक्तीला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या डोक्यापर्यंत जायचं असेल तर तब्बल ३५४ पायऱ्या चढून जावं लागतं. मूर्तीच्या आतून मुकूटापर्यंत जाण्यासाठीही रस्ता आहे. या मूर्तीच्या एका हातात जळती मशाल तर दुसऱ्या हातात एक पुस्तक आहे. या स्वातंत्र्यदेवतेच्या मुर्तीच्या उजव्या हातातील ज्योत स्वातंत्र्याचा प्रकाश दर्शवते तर डाव्या हातातील पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक आहे. हे पुस्तक  २३ फूट ७ इंच लांब आणि १३ फूट ७ इंच रूंद आहे. यावर JULY IV MDCCLXXVI असं लिहिलं आहे. हे ४ जुलै १७७६ ही तारीख दर्शवतं. त्यामुळे या मूर्तीला अमेरिकेच्या स्वतंत्रता दिनाच्या दिवशी जगभरातील लोक मोठ्या संखेने लोक भेट देतात.  ह्या देवतेच्या डाव्या हातात जे पुस्तक दिसते ते पुस्तक नसून टॅबलेट असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. या टॅबलेटचे नाव tabula ansata म्हणजे कायद्याची सुरुवात करणारे टॅबलेट होय. ह्या टॅबलेटचा आकार एखाद्या कीस्टोन सारखा आहे. अमेरिकेतील सगळ्या नागरिकांसाठी सारखाच कायदा आहे, अमेरिकेत लोकशाही आहे आणि याचाच अर्थ की अमेरिकेत सर्वांना स्वातंत्र्य आहे असा त्यातून संदेश जातो. हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. म्हणजेच ते पुस्तक ज्याला काही लोक टॅबलेट म्हणतात, ते  अमेरिकेतील सामान नागरी कायद्याचे प्रतीक आहे. ते समानतेचे आणि न्यायाचे प्रतीक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!