Just another WordPress site

Salman Rushdie attacked : सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला, ते कट्टर पंथीयांच्या निशाण्यावर का आहेत?

ज्येष्ठ साहित्यिक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हल्ला झाला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रश्दी जमिनीवर कोसळले. सध्या हल्ला करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं.  भारतात याबाबत चर्चा रंगू लागल्या मात्र, अनेकांना माहिती नाही की सलमान रश्दी कोण आहेत आणि त्यांचा भारताशी संबंध काय? याच विषयी जाणून घेऊ.



महत्वाच्या बाबी 

१. रश्दींचा जन्म मुंबईतील काश्मिरी मुस्लिम कुटुंबात झाला

२. त्यांचं द सॅटेनिक व्हर्सेस हे पुस्तक वादग्रस्त  ठरलं

३. १९८१ साली सलमान रश्दींना बुकर पुरस्कार मिळाला होता

४. रश्दी यांना तब्बल ९ वर्षे अज्ञातवासात रहावं लागलं होतं

सलमान रश्दी यांचे पूर्ण नाव अहमद सलमान रश्दी. त्यांचा जन्म १९ जून  १९४७ रोजी मुंबईतील एका भारतीय काश्मिरी मुस्लिम कुटुंबात झाला. सलमान रश्दीच्या वडिलांचे नाव अनीस अहमद रश्दी आहे. रश्दी मुंबईत लहानाचे मोठे झाले आणि त्यांचे शिक्षण दक्षिण मुंबईतील फोर्टमधील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये झाले. भारतातून इंग्लंडमध्ये गेल्यानंतर, त्यांनी वॉर्विकशायरमधील रग्बी स्कूलमधून आणि नंतर केंब्रिजच्या किंग्ज कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. ते ब्रिटिश भारतीय लेखक आहेत. त्यांची पहिली कादंबरी १९७५ साली प्रकाशित करण्यात आली होती. ग्रिमस असं या कादंबरीचं नाव होतं. पुढं १९८१ साली त्यांचं मिडनाईट चिल्ड्रन हे पुस्तक प्रकाशित झालं. याच पुस्तकाला १९८१ सालचा बुकर पुरस्कार मिळाला होता. रश्दींनी आतापर्यंत ४ लग्ने केली आहेत. त्यांनी आपला पहिला विवाह  क्लेरिसा लुआर्डशी लग्न केले होते. त्यांची दुसरी पत्नी अमेरिकन कादंबरीकार मारियान विगिन्स होती. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट घेऊन  एलिझाबेथ नामक स्त्रीशी विवाह केला.. त्यांचं तिसरं लग्न तर २००४ पर्यंत टीकलं. त्यानंतर त्यांनी पद्मा लक्ष्मी या एक भारतीय-अमेरिकन अभिनेत्री-मॉडेलशी विवाह केला. हे लग्न २  जुलै २००७ पर्यंत चालले. रश्दी हे सन २००० पासून अमेरिकेत राहतात. त्यांनी अनेक वादग्रस्त पुस्तके लिहिली.  त्यांच्या लिखानामुळे अनेकदा वादातही राहिले आहेत. ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर इराणमध्ये १९८८ पासून बंदी घालण्यात आली.  या पुस्तकातून रश्दींनी धर्मनिंदा केली आहे, असे अनेक मुस्लिमांचे मत आहे. या संदर्भात इराणचे तत्कालीन सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला रुहोल्ला खामेनी यांनी रश्दींना फाशीची शिक्षा देण्याचा फतवा काढला होता. तर रश्दींची हत्या करणार्‍याला ३ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.  द सॅटेनिक व्हर्सेस या कादंबरीचे विविध भाषेत भाषांतर करणाऱ्या ५९ जणांचा वेगवेगळ्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. तर कादंबरीचे लेखक रश्दी यांना तब्बल ९ वर्षे अज्ञातवासात रहावं लागलं होतं. रश्दी यांनी आतापर्यंत १४ कादंबऱ्या लिहील्या.  त्यामध्ये ग्रिमस, मिडनाईट चिल्ड्रन, शेम, द सॅटेनिक व्हर्सेस, हरून अँड द सी ऑफ स्टोरी, द मूर लास्ट साई यांचा समावेश आहे. दरम्यान,  रश्दी यांच्यावर हल्ला करणाऱ्या २४ वर्षीय हादी मतार या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलिस  या हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे, हे स्पष्ट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!