Just another WordPress site

Safety Pin : दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या सेफ्टी पिनचा शोधाच्या इतिहास काय, जाणून घ्या रंजक कहाणी

दिव्याचा शोध कुणी लावला असं तुम्हाला विचारलं तर क्षणाचाही विलंब न करता तुम्ही  एडिसनने असं उत्तर द्याल. मात्र, सेफ्टी पिनचा शोध कुणी लावला असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही तुमची पंचाईत होईल. तुम्हाला त्याचं उत्तर सांगता येणार नाही.  सेफ्टी पिन ही अशी गोष्ट आहे, जी अनेक प्रकारे वापरली जाते. अनेकजण सेफ्टी पिनचा वापर सुरक्षेपेक्षा इतर गोष्टींसाठी अधिक करतात. अगदी दात साफ करण्यासाठी, अचानक कपडे फाटल्यावर ते जोडण्याकरता किंवा बटण म्हणून सेफ्टी पिनचा वापर केला जातो. मात्र या सेफ्टी पिनचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? याच विषयी जाणून घेऊ.



हायलाईट्स

१. सेफ्टी पिनच्या संशोधकाचं नाव आहे वॉल्टर हंट

२. वॉल्टर यांनी फक्त ४०० रुपयांना विकलं होतं पेटंट

३. वॉल्टर हंट यांनीच शिलाई यंत्राचाही शोध लावला

४. सेफ्टी पिनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो


सेफ्टी पिनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. महिलांच्या पर्समध्ये हमखास सेफ्टी पिन असतेच असते. सेफ्टी पिन या नावात ‘सेफ्टी’ हा शब्द आहे. सुरक्षित ठेवण्याव्यतिरिक्त अनेक प्रकारे याचा वापर होतो. कान आणि दात स्वच्छ करण्यापासून ते कपडे किंवा बटणे म्हणून लोक सेफ्टी पिनचा वापर करीत असतात. रस्त्याने जाताना अचानक कधी चप्पल तुटली तर मदतीला येते ती सेफ्टी पिनच. स्त्रियांना साडी  नेसताना तर सेफ्टी पिनची गरज असतेच असते. याशिवाय काही वेळा बटण म्हणूनही हिचा वापर केला जातो.  सेफ्टी पिन अतिशय छोटी वस्तू असली तरी  रोजच्या वापरात अतिशय उपयुक्त ठरतेय. मात्र,  तिच्या शोधाबद्दल आपल्याला काहीही माहिती नसतं. सेफ्टी पिन बनवण्याबाबतही अनेक कथा इंटरनेटवर दिसत असल्या तरी ती बनविण्या मागची कहाणी खुपच रंजक आहे.  सेफ्टी पिनच्या संशोधकाचं नाव आहे वॉल्टर हंट.  सेफ्टी पिनचा शोध त्यांनी १८४९ च्या दरम्यान लावला. अनेक छोट्या छोट्या गोष्टीचा त्यांनी शोध लावला.  वॉल्टर हंट यांच्यावर खूप कर्ज होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी एखाद्या नवीन गोष्टीच्या ते शोधात होते. एखादी नवीन गोष्ट विकसित करायची आणि त्याच्या विक्रीतून पैसे कमावून कर्जफेड करण्याचा त्यांचा विचार होता. यातूनच त्यांनी सेफ्टी पिनची निर्मिती केली. असं म्हटलं जातं की, एकदा त्यांच्या पत्नीच्या ड्रेसचं बटण तुटलं होतं, त्या वेळी त्यांनी  एका वायरचा बटन म्हणून वापर करुन ते ड्रेसला लावलं होतं. यानंतर त्यांनी ही सेफ्टी पिन वायरपासूनच बनवली, ज्याला ड्रेस पिन असं म्हणतात. त्यावेळी तारांच्या जागी सेफ्टी पिन वापरल्या जात होत्या. तारेच्या तुलनेत सेफ्टी पिनमुळे लोकांच्या बोटांना कमी इजा होत होती. म्हणून याला सेफ्टी पिन म्हटले जाऊ लागले.  आज भारतीय पारंपरिक पोशाख असणाऱ्या साडीसाठी तर ही सेफ्टी पिन अत्यंत महत्त्वाची बाब आहे. याशिवाय अनेक ठिकाणी वापर केला जाणारी ही सेफ्टी पिन छोटीशी असली तरी सेफ्टी पिन नसेल तर अनेकदा कामं अडतं. बदलत्या काळातही तिची उपयुक्तता कमी न झाल्याने तिच्या डिझाइनमध्ये छेडछाड न करता ती बनवणाऱ्या कंपन्यांनी महिलांच्या साडीच्या रंगानुसार सेफ्टी पिन रंगीबेरंगी केली. दरम्यान, सेफ्टी पिनचा शोध लावणाऱ्या या माणसाचं नाव आपल्याला माहित असण्याचं कारणच नव्हतं. कारण त्यांनी तयार केलेली कोणतीच गोष्ट आज त्यांच्या नावावर नाही.  तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या माणसाने १५ डॉलरचे कर्ज फेडण्यासाठी सेफ्टी पिनचं पेटंट अवघ्या ४०० डॉलर्सला विकलं होतं. ते विकत घेणाऱ्या कंपनीनं मात्र यातून करोडो कमावले.  सेफ्टी पिननं  वॉल्टर यांचं कर्जामुळे फाटलेलं आयुष्यही सुरक्षित केलं, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. याच वॉल्टर हंट यांनी  सेफ्टी पिनसह पेन, चाकूला धार करण्याचं उपकरण, स्पिनर अशा अनेक गोष्टींचा शोध लावला. शिलाई मशीनही त्यांनीच तयार केलं. वॉल्टर हंटर यांनी  आपल्या पूर्ण आयुष्यभरात शेकडो शोध लावले, मात्र,  पेटंट विकून आपली उपजीविका चालवावी लागत असल्यानं त्यांचं नाव आज कुणालाही माहित नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!