Just another WordPress site

दु:खद वार्ता : आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज ऍलन थॉमसन यांचे येथे निधन

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचे माजी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटपटू व वेगवान गोलंदाज ऍलन थॉमसन यांचे येथे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. एकदिवसीय सामन्यांत पहिला बळी घेण्याची कामगिरी त्यांच्या नावावर नोंदली गेली आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील येथे १९७०-७१ साली झालेल्या ऍशेस कसोटी मालिकेतील कसोटी पूर्ण होऊ शकली नाही. पहिले तीनही दिवस संततधार पाऊस पडला होता.

मात्र, चाहत्यांची निराशा होऊ नये यासाठी या दोन संघात पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळवला गेला व त्यात ऑस्ट्रेलियाने विजय प्राप्त केला. या लढतीत ऍलन थॉमसन यांनी बिर लॉरीकरवी जेफ बॉयकॉट यांना बाद केले. हाच एकदिवसीय सामन्यांतील पहिला बळी ठरला व तो घेण्याचा मान थॉमसन यांच्या नावावर कायमचा कोरला गेला.

१९७०-७१ सालच्या इंग्लंडविरुद्धच्या सात सामन्यांच्या अशेस कसोटी मालिकेत त्यांनी हा विक्रम साकार केला. याच मालिकेत त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण केले. कसोटीचे तीन दिवस वाया गेल्याने ५ जानेवारी १९७१ रोजी येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेटच्या इतिहासातील पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात ऍलन यांनी ८ षटकांत २२ धावा देत एक बळी घेतला. अर्थात या सामन्यानंतर त्यांना पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय सामने खेळण्याची संधीच मिळाली नाही. थॉमसन यांनी ऑस्ट्रेलियासाठी ४ कसोटी सामने खेळताना १२ गडी बाद केले. प्रथम दर्जाच्या क्रिकेटचे ४४ सामने खेळताना त्यांनी १८४ बळी घेतले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!