Just another WordPress site

ऋषभ पंतसाठी अगदी खास असणारी ‘ती’ व्यक्ती रुग्णालयात येऊन भेटलीच, पंतसोबतचा फोटो आला समोर

नवी दिल्ली: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या रुग्णालयात दाखल आहे. रुरकीजवळ ३० डिसेंबरला सकाळी त्यांचा कार अपघात झाला. तेव्हापासून त्याच्यावर डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋषभ पंतला भेटण्यासाठी कलाकारांपासून ते क्रीडा जगतापर्यंतचे चाहते येत आहेत. पण यावेळेस ऋषभला भेटण्यासाठी त्याला मदत करणारे दोन देवदूत गेले होते. त्यांचा एक फोटो समोर आला आहे. पंत सुद्धा या दोघांची वाट पाहत होता.

यावेळी रजत आणि निशू हॉस्पिटलमध्ये ऋषभ पंतला भेटायला आले होते, ते अपघातानंतर पंतसाठी देवदूत म्हणून आले होते. अपघातानंतर रजत आणि निशू यांनी ऋषभ पंतला जवळच्या रुग्णालयात नेले होते. त्यांनी स्वतः ही गोष्ट सांगितली आहे.
रजत आणि निशू यांनी सांगितले की, कार अपघातानंतर ऋषभ पंतच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते. तेव्हा फक्त रजत आणि निशूनेच त्यांची घोंगडी आणि टॉवेल पंतला दिले होते. यानंतर दोघेही ऋषभ पंतला रुग्णवाहिकेतून रुरकी येथील सक्षम रुग्णालयात घेऊन गेले. जिथे पंतवर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. यानंतर त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले.
ऋषभ पंतचा नवीन फोटो रुग्णालयातून समोर येत आहे. यात रजत आणि निशू ही दोन्ही मुलं दिसत आहेत. यासोबतच ऋषभ पंतची आई सरोजही दिसत आहे. या फोटोत पंतचे हात दिसत आहेत. त्याच्या डाव्या हाताला ड्रीप लावली आहे. त्या हाताला आधार मिळावा यासाठी एक उशी देखील ठेवण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या उजव्या हाताला पट्टी बांधलेली दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!