Just another WordPress site

चीनमध्ये कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले, १ जानेवारीपासून नवा नियम होणार लागू

China retirement ages : चीनमध्ये (China) १९५० नंतर प्रथमच व्यावसायिक आणि कामगारांचे निवृत्तीचे वय ( Retirement Age)वाढवले जाणार आहे. चीन सरकारने शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. टप्प्याटप्प्याने निवृत्तीचे वय वाढवणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

महायुतीला विदर्भात तगडा झटका बसणार?   भाजपच्या अंतर्गत सर्व्हेने वाढवली डोकेदुखी 

सरकारने म्हटले आहे की अंगमेहनतीचे काम करणाऱ्या (ब्लू कॉलर जॉब) महिलांचे निवृत्तीचे वय ५० वरून ५५ वर्षे केले जाईल. तर व्यावसायिक काम करणाऱ्या (व्हाइट कॉलर जॉब ) महिलांसाठी ते ५५ वरून ५८ पर्यंत वाढवले जाईल. पुरुषांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६३ केले जाईल.

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, निवृत्तीचे कायदेशीर वय पूर्ण होण्यापूर्वी निवृत्तीची परवानगी दिली जाणार नाही. चीनमध्ये सध्याचे निवृत्तीचे वय जगातील सर्वात कमी वय आहे. चीन सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार, हा बदल १ जानेवारी २०२५ पासून लागू होईल. पुढील १५ वर्षांमध्ये दर काही महिन्यांनी निवृत्तीचे वय आणखी वाढवले जाईल.

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर लाल बावटा धडकला, आरक्षण वाढीसह अन्य मागण्यांसाठी भाकपचा भव्य मोर्चा 

चीन सरकारला वृद्ध लोकसंख्येमुळे हा निर्णय घ्यावा लागला. म्हणजेच देशात तरुणांची कमतरता आहे, त्यामुळे कामगार आणि व्यावसायिकांचे निवृत्तीचे वय वाढवले जाणार आहे. चीनच्या सोशल मीडिया विबोवर लोक यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, पुन्हा दहा वर्षांत एक ठराव पास केला जाईल आणि त्यानंतर आम्हाला सांगितले जाईल की आम्हाला ८० वर्षांचे होईपर्यंत निवृत्त होण्याचा अधिकार नाही.

शिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची आणि पेन्शन धोरण समायोजित करण्याची योजना चीनमधील सरासरी आयुर्मान, आरोग्य परिस्थिती, लोकसंख्येची रचना, शिक्षण पातळी आणि कर्मचारी पुरवठा यांच्या सर्वसमावेशक मूल्यांकनावर आधारित होती.

चीन सरकार पेन्शन
देऊ शकत नाही ? सरकारच्या वतीने, चायनीज ॲकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसने २०१९ मध्ये सांगितले होते की देशाचा मुख्य राज्य पेन्शन फंड २०३५ पर्यंत संपेल. २०१९ मध्ये कोविड १९ महामारीमुळे चीनची अर्थव्यवस्था कोलमडली. अशा स्थितीत निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन देण्यात सरकार पूर्वीइतके कार्यक्षम नाही. निवृत्तीचे वय वाढवल्यास सरकारी तिजोरीवरचा बोजा कमी होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!