Just another WordPress site

पोटच्या लेकाचा आई-बापानेच काढला काटा, गळा आवळून केली हत्या, आरोपींना अटक

दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळलेल्या आई-वडिलांनीच व्यसनाधीन एकुलत्या एक मुलाच्या हत्येसाठी ८ लाखांची सुपारी दिल्याची घटना हैदराबादमधून समोर आली आहे. साई राम असे हत्या झालेल्या पुत्राचे नाव आहे. तर क्षत्रिय साईनाथ आणि राणी बाई असे मुलाच्या हत्येची सुपारी देणाऱ्या माता-पित्याचे नाव आहे. या दोघांनाही खम्मम पोलिसांनी अटक केली आहे. २६ वर्षीय साई रामने शिक्षण सोडले होते. साई रामची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी आई-वडिलांशिवाय इतर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हत्येसाठी मुलाला मंदिरात नेले

१८ ऑक्टोबरला सत्यनारायण आणि रवी साई रामला कारमधून कल्लेपल्लीतील एका मंदिरात घेऊन गेले आणि दुसऱ्या आरोपींना भेटले. सर्वांनी मद्यपान केले होते आणि साई राम नशेत बेधुंद झाल्यावर दोरीने त्यांनी त्याचा गळा आवळला. हत्येनंतर साई रामचा मृतदेह सूर्यापेटमधील मुसीमध्ये त्यांनी फेकून दिला. पोलिसांनी आई-वडिलांची चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला.

हत्येनंतर मृतदेहाची ओळखही पटवली

साई रामचा मृतदेह १८ ऑक्टोबर रोजी सूर्यापेटच्या मूसीहून जप्त करण्यात आला. एक आरोपी फरार आहे. सुपारी देणाऱ्या आई-वडिलांविषयी CCTV फुटेजमधून कळाले. हत्येसाठी वापरण्यात आलेली कार पोलिसांना दाम्पत्यापर्यंत घेऊन गेली. या लोकांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रारही केली नव्हती. २५ ऑक्टोबर रोजी मुलाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी दोघेही त्याच कारने शवागारात गेले होते.

मुलाला पुनर्वसन केंद्रातही पाठवले होते

साई राम मारिपेडा बांग्ला गावातील सरकारी शाळेत मुख्याध्यापक होता. दाम्पत्याचा एक मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. पोलिसांनी सांगितले की दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यावर साई राम आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करायचा. साई रामला त्याच्या कुटुंबियांनी हैदराबादमधील एका पुनर्वसन केंद्रात पाठवले होते, पण याचा काहीही फायदा झाला नव्हता.

हत्येसाठी पत्नीने भावाला दिली सुपारी

हुजुराबाद CI रामलिंगा रेड्डींनुसार दाम्पत्याने मुलाच्या हत्येसाठी राणी बाईंचा भाऊ सत्यनारायणची मदत घेतली. सत्यनारायणने हत्येसाटी मिर्यालागुडा मंडळातील आर रवी, डी धर्मा, पी अगरराजू, डी साई आणि बी रामबाबूलाही प्लॅनमध्ये सामील केले. दाम्पत्याने दीड लाख अॅडव्हान्स दिले. उर्वरीत साडेसहा लाख रुपये हत्येनंतर तीन दिवसांनंतर देऊ असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!