Just another WordPress site

निसर्गाची अद्भुत देणगी असलेल्या सूर्याचा रंग पिवळा, पांढरा की आणखीन कोणता?

सूर्याचं चित्र काढायचं असेल तर आपण हमखास पिवळा रंग हातात घेतो. त्यात नारंगी आणि लाल रंग सुद्धा वापरतो. मात्र, आपल्या सूर्यमालेच्या मध्यभागी असलेला हा तारा खरं तर पिवळा नाही, ना तो नारंगी किंवा लाल रंगाचा आहे. मग सूर्याचा रंग नेमका आहे तरी कोणता ? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. काही संशोधनानुसार, सूर्याचा रंग प्रत्यक्षात पांढरा
२. सूर्याचा रंग पिवळ्या आहे, असा सामान्य समज
३. सूर्य जेव्हा उगवत असतो तेव्हा लाल दिसतो
४. ‘टेलिस्कोप मधून सूर्याचा रंग समोर येऊ शकत नाही’

 

मनुष्य, प्राणि, पक्षी, फुलझाडे या सर्वांना प्रेरणा देणारी निसर्गाची अद्भुत देणगी म्हणजे सूर्य. तुम्हीही कधीतरी सुर्यास्त किंवा सुर्यादयाचा आनंद घेतला असेल. त्यावेळी तुम्हाला सूर्याचा लाल किंवा पिवळसर रंग पाहिला असेल. मात्र, सूर्याचा नेमका रंग कोणता? हा कित्येक वर्षांपासून संशोधनाचा विषय आहे. काही संशोधनानुसार, हे सुद्धा सांगण्यात आलं आहे की, सूर्याचा रंग हा प्रत्यक्षात पांढरा आहे. सूर्याचे ऑनलाईन फोटो बघितले तर असं लक्षात येतं की, प्रत्येक वेबसाईटवर, टीव्हीवर सूर्य हा नेहमीच पिवळ्या रंगाचा दाखवण्यात येतो. सूर्य पिवळ्या रंगाचा दिसण्याचं कारण हे त्याच्या भोवती असलेलं वातावरणाचं आवरण आहे असं सांगितलं जातं.

 

सूर्याचा नेमका रंग कोणता?

तुम्ही जर प्रिझमच्या माध्यमातून सूर्यप्रकाश पाहिला तर तो प्रकाश आपल्याला एकसारखा पिवळ्या रंगाचा दिसतो. सूर्यप्रकाश पिवळ्या रंगाचा वाटण्याचं कारण म्हणजे इंद्रधनुष्य. सूर्यप्रकाश पिवळ्या रंगाचा दिसणे हे सुद्धा या सात रंगाचं प्रतिबिंब असल्याचं काही शास्त्रज्ञांनी लिहून ठेवलं आहे. प्रकाश लहरी या एकत्र येऊन पांढरा रंग परावर्तित करतात तो सूर्याचा खरा रंग आहे हेसुद्धा मत नोंदवण्यात आलं आहे. सूर्य रोज विविध रंग, प्रकारच्या प्रकाशलहरी परावर्तित करत असतो. या प्रकाशलहरींचा सर्वात मोठा भाग जर बघितला तर तो हिरव्या रंगाचा दिसतो हे सुद्धा एका अभ्यासात समोर आलं आहे.

 

मावळतीचा लाल रंग?

सूर्य जेव्हा उगवत असतो किंवा मावळत असतो तेव्हा तो क्षितीजापासून सर्वात जवळच्या बिंदूवर असतो. त्यामुळं निळ्या छटा असलेल्या रंगामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतात आणि त्यामुळं मोठ्या तरंगलांबीतील लाल आणि केशरी रंगाचं सूर्याच्या प्रतिमेवर प्रभाव पाहायला मिळतो. त्यामुळं मावळतीला सुर्याचा रंग आपल्याला लाल दिसतो.

 

नासा काय सांगते?

जगातील सर्वात मोठी अवकाश संशोधन करणारी नासा ही संस्था सुद्धा हे मान्य करते की, कोणत्याही टेलिस्कोप मधून जरी आपण सूर्याचा रंग शोधण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्यासमोर सूर्याचा खरा रंग समोर येऊ शकत नाही. सूर्याच्या फोटोमध्ये किंवा चित्रांमध्ये पिवळ्या रंगाचा वापर करणे हे केवळ उष्णता, ज्वाला यांच्याशी साधर्म्य राखणारा आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी जेव्हा आपण सूर्याला एखाद्या टेलिस्कोप किंवा डोळे सुरक्षित ठेवणाऱ्या फिल्टरच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सूर्याचा रंग हा नेहमीच पिवळ्या रंगाचा दिसत असतो. याचं कारण हे आहे की, त्या सर्व फिल्टर, टेलिस्कोपच्या काचा या आपल्या डोळ्यांना सहन होतील अशा प्रकारच्या करण्यात आलेल्या असतात. पण, त्यामुळे सूर्याचा रंग पिवळा आहे हे सिद्ध होत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!