Just another WordPress site

MBBS BDS Admission : एमबीबीएस, बीडीएसचा दुसरा कॅप राउंड कधीपासून? जाणून घ्या प्रवेश वेळापत्रक

MBBS BDS Admission : वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या (Medical and Dental Courses) पहिल्या फेरीतील प्रवेश ५ सप्टेंबर रोजी संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील प्रवेशाचे वेळापत्रक वैद्यकीय समुपदेशन समितीने जाहीर केले आहे. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष वैद्याकीय व दंत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीला २६ सप्टेंबरपासून सुरुवात करीत आहे. दरम्यान, १ ऑक्टोबरपासून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

Ahmednagar : प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मिळेना विद्यावेतन, जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार; पाच महिन्यांपासून प्रतीक्षा 

नवी दिल्लीतील वैद्याकीय समुपदेशन समितीकडून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची प्रवेश फेरी राबविण्यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यानुसार प्रवेशाच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात येते. वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश फेरी ५ सप्टेंबर रोजी संपली. या फेरीमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश करण्यासाठी वैद्याकीय समुपदेशन समितीने दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या जागांचा तपशील २६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय भरता येणार आहे. दुसऱ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Vidhansabha Election : राज्यात काँग्रेसला ‘अच्छे दिन’, विधानसभेसाठी तब्बल १४०० जण इच्छुक 

तिसऱ्या फेरीला ९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान अर्ज नोंदणी करता येणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी वैद्याकीय व दंत अभ्यासक्रमाची एकत्रित अंतरिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी वैद्याकीय व दंत अभ्यासक्रमाची तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!