Just another WordPress site

Manvendra Singh । बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशी पथकाचे प्रमुख असलेले मानवेंद्र सिंग यांची पार्श्वभूमी काय?

भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर तमिळनाडूमध्ये कोसळलं. या अपघातात भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  जनरल  बिपिन रावत यांचे निधन झाले.  दरम्यान,  या घटनेची चौकशी करण्याचे आदेश भारतीय वायूसेनेने दिले आहेत. एअर मार्शल मानवेंद्रसिंगयांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी केली जात असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले. दरम्यान, मानवेंद्रसिंग हे नेमके कोण आहेत? याविषयी जाणून घेऊया.


हायलाईट्स

१. बिपीन रावत यांच्या अपघाताविषयी वेगवेगळ्या शक्यता 

२. राजनाथसिंह यांचे अपघाताची चौकशी करण्याचे आदेश 

३. दुर्घटनेच्या चौकशी पथकाचे प्रमुख मानवेंद्र सिंग

४. मानवेंद्र सिंग यांची प्रदीर्घ कारकीर्द वाखाण्याजोगी 


बिपीन रावत प्रवास करत असलेल्या लष्करी हेलिकॉप्टरचा  काल तमिळनाडूतील कुन्नूर येथे अपघात झाला. हा अपघात झाला त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह आणखी १४ सहकारीही प्रवास करत होते. या अपघातात काहींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सीडीएस बिपीन रावत यांना तातडीने तामिळनाडूच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बिपीन रावत यांचे निधन झाले. या अपघाताबद्दल वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी अपघाताची चौकशी करण्याची मोठी घोषणा केली. एअर मार्शल मानवेंद्र सिंग सीडीएस बिपिन रावत हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या पथकाचे प्रमुख आहेत. मानवेंद्र सिंग हे भारतीय हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडर असून ते स्वतः हेलिकॉप्टर पायलट आहेत. एअर मार्शल मानवेंद्र सिंग २९ डिसेंबर १९८२ रोजी हेलिकॉप्टर पायलट म्हणून भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रँचमध्ये सामील झाले. त्यांनी याच वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रयागराजमध्ये मध्य हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. २०१९ च्या सुरुवातीला, एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांनी हवाई मुख्यालयात महासंचालक  पदाची सूत्रे हाती घेतली. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत मार्शल यांनी अनेक प्रकारची हेलिकॉप्टर उडवली. मानवेंद्र सिंग यांना ६ हजार ६०० तासांपेक्षा जास्त तास उड्डाणाचा अनुभव आहे. वैमानिक असण्यासोबतच एअर मार्शल मानवेंद्र सिंग हे प्रशिक्षित फ्लाइंग इंस्ट्रक्टर देखील आहेत. त्यांना प्रशिक्षणाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांना ऑपरेशनल हेलिकॉप्टर युनिटचे कमांडिंग ऑफिसर देखील बनवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना अॅडव्हान्स हेलिकॉप्टर बेसचा स्टेशन कमांडर बनवण्यात आले. त्यांना अति विशिष्ट सेवा पदक, वीर चक्र आणि विशिष्ट सेवा पदक या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. दरम्यान, मानवेंद्र सिंग या दुर्घटनेच्या चौकशीतून काय समोर आणतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!