Just another WordPress site

Police Bharti : पोलिस दलात मोठी संधी! डिसेंबर महिन्यात पुन्हा भरती, राज्यात 7500 तर मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदं

Police Bharti : पोली (Police) होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी खुशखबर आहे. राज्यात गेल्या दोन वर्षांत जवळपास ३५ हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे. तब्बल साडेसात हजार पदांसाठी भरती (Police Bharti) होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे आहेत. राज्यात २०२२ व २०२३ मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे.

Ladaki Bahin Yojana : अजितदादांनी शेतावर जाऊन समजावली ‘लाडकी बहीण योजना’ 

करोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे १८ हजार व १७ हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी, लवकरात लवकर सध्याची १४ हजार ४७१ पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते. आतापर्यंत २५ जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदाने न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीराने सुरू झाली होती. परंतु ती ही लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात नवीन पोलिस भरतीला सुरुवात होणार आहे.

मुंबईत पोलीस दलात मनुष्यबळ वाढणार
● मुंबईतही गेल्या वर्षी आठ हजार पदांची भरती झाली होती. त्यातील बहुतांश पोलीस त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरमध्ये पोलीस दलात दाखल होणार आहेत.

● मुंबईत ४,२३० पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पोलिसांकडे ५ लाख ६९ हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी दोन हजार ५७२ पोलीस हवालदार, ९१७ चालक, ७१७ तुरुंग हवालदार आणि २४ बँड्समन पदांसाठी अर्ज करण्यात आले आहेत.

● सर्वांची मैदानी परीक्षा सुरू आहे. याशिवाय मुंबई पोलीस दलाला आणखी १२०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या भरतीनंतर ही पदे भरली जाणार आहेत.

प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढणार
राज्यातील १० पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमताही आता वाढविण्यात आली आहे. सध्या १० प्रशिक्षण केंद्रांमध्ये ८४०० पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. येणाऱ्या काळात त्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!