Just another WordPress site

Kalpna chawala : हरिणायाची मुलगी ते नासाची अंतराळवीर : कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास कसा होता?

आधुनिक अंतराळ विज्ञानात भारतीय शास्रज्ञांनी मोठं योगदान दिलं. त्यामध्ये प्रामुख्यानं नाव घेतलं जातं ते  कल्पना चावला यांचं.  त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. कल्पना चावला यांचे आजच्या दिवशी यानामध्ये अपघाती निधन झालं होतं. त्यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरलाय.  याच निमित्ताने त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? आणि कसा झाला अपघात ? याच विषयी जाणून घेऊया.

हायलाईट्स

१. कल्पना चावला यांचा जन्म १९६२ साली झाला

२. कल्पना यांना अंतराळ विज्ञानमाध्ये होता रस 

३. १९८८ मध्ये नासात काम करायला केली सुरुवात 

४. १ फेब्रुवारी २००३ ला झाले अपघाती निधन 


कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ ला भारतातील हरियाणामध्ये झाला. त्यांना लहानपणापासूनच खगोलशास्र, अंतराळ विज्ञान या विषयांमध्ये आवड होती. ८ वीत असतानाच त्यांनी वडिलांकडे इंजिनिअर होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे शालेय शिक्षणानंतर त्यांनी त्याच क्षेत्रातलं शिक्षण घेतलं. १९८२ साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून त्यांनी वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. तिथे त्यांनी कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातून एरोस्पेसमध्ये  पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर १९८८ मध्ये त्यांनी नासा एम्स रिसर्च सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथे त्यांनी कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स विषयात संशोधन केलं. पुढं नासाने १९९४ साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना चावला यांचा समावेश केला. मार्च १९९५ साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉनसन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये त्यांनी प्रशिक्षण चालू केलं. नंतर एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम कल्पना यांना देण्यात आलं. पुढं नोव्हेंबर १९९६ मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये STS – ८७ मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना चावला यांच्याकडं दिली. १८ नोव्हेंबर १९९७ ला  STS-८७ या अवकाश यानाने अवकाशात झेप घेतली. ही कल्पना चावला यांची पहिली अंतराळ मोहीम होती. त्यावेळी त्यांनी ३७६ तास आणि ३४ मिनिटं अंतराळात घालवली. कल्पना चावला आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला २५२ फेऱ्या मारल्या.  म्हणजे त्यांनी १ कोटी ४६ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला. त्यानंतर पुढे नासाने आणखी एक महत्त्वपूर्ण योजना आखली.  आणि STS-१०७ या अंतराळ मोहिमेसाठी कल्पना चावला यांची २००१ मध्ये निवड केली. तेव्हा  ७ सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही कल्पना चावला यांच्याकडे देण्यात आली. जानेवारी २००३ च्या १६ दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते. याच मोहिमेतून  परतताना १ फेब्रुवारी २००३ ला कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिके जवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं. त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या ८.४० वाजता यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते. २२ मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. प्रत्येकजण कल्पना चावला यांच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत होता, मात्र, सुमारे ८.५४ वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. अवकाश यानाचा पृथ्वीच्या कक्षेजवळ येत असतानाच स्फोट झाला. स्पोटात  यानातील सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्पना पुन्हा पृथ्वीवर परतल्याच नाही.  दरम्यान, शास्त्रज्ञांच्या मते, कोलंबियाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच त्याचे थर्मल इन्सुलेशन थर फाटले आणि या अपघातामुळे वाहनाचे तापमान वाढल्याने ही घटना घडल्याचे सांगितले होते. ज्या दिवशी कल्पना चावला आणि त्यांचे सहकारी अतराळात गेले, त्याच दिवशी त्यांचा मृत्यू निश्चित झाला होता. या ७ प्रवाशांच्या मृत्यूचा अलार्मही डिस्कव्हरी फ्लाइटने वाजवला होता. हे लोक १६ दिवस मृत्यूच्या छायेत राहिले. नासाला हे सगळं माहित होतं.  मात्र,  त्यांनी कोणाला काहीच सांगितले नाही. आश्चर्य वाटेल, मात्र, हे खरं आहे. मिशन कोलंबियाच्या कार्यक्रम व्यवस्थापकांनी ही माहिती दिली.  मग प्रश्न असा आहे की, नासाने अंतराळवीर आणि त्यांच्या कुटुंबीयांपासून ही माहिती का लपवली. तर  मोहिमेवरील अंतराळवीरांनी अपघात होईपर्यंत त्यांना या मोहिमेचा आनंद घ्यावा असं नासाला वाटत होतं. त्यामुळे त्यांनी अपघाताची माहिती कुणालाच दिली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!