Just another WordPress site

रेशन वाटपात केला बदल, आता मिळणार गव्हासोबत मका

गडचिलोरी : यावर्षी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात रेशनकार्डधारकांना (Ration card holders) गव्हासोबतच आता मका (Maize) दिला जाणार आहे. त्यामुळे आता रेशन व जमीन मका कार्डधारकांना दोन ऐवजी तीन थैल्या घेऊन रेशन दुकानामध्ये जावे लागणार आहे. (There has been a change in the distribution of ration, now maize will be given along with wheat)

अंत्योदय लाभार्थीना प्रतिकार्ड एकूण ३५ किलो धान्य दिले जात होते. त्यामध्ये १० कलो गहू व २५ किलो तांदूळाचा समावेश आहे. आता या लाभार्थीना ५ किलो गहू व २५ किलो तांदूळाचा समावेश आहे. आता या लाभार्थीना ५ किलो गहू, ५ किलो मका व उर्वरित २५६ किला तांदूळ दिले जाणार आहेत. प्राधान्य कुटूंबांतील प्रति लाभार्थीला यापूर्वी २ किलो गहू दिले जात होते. आता १ किलो मका व १ किलो गहू तसेच उर्वरित ३ किलो तांदूळ दिले जाणार आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात मक्याचा पुरवठा केला जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन मका पिकासाठी योग्य असल्याने अनेक शेतकरी मका पिकाकडे वळत आहेत. शेतकऱ्यांकडील मका शासन आधारभूत किमतीने खरेदी करते. पुढे हा मका जिल्ह्यातील कार्डधारकांना वितरित केला जाते. मक्यापासून कोणते पदार्थ बनवावे, हे अनेकांना माहीत नसल्याने सदर मका थेट व्यापाऱ्यांना विकल्या जात असल्याचे गडचिरोली जिल्ह्यात दिसून येते.

मक्यापासून नेमके कोणते पदार्थ बनतात, याचे धडे देण्याची गरज…
अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांमध्ये मक्याचे उत्पादन घेतले जाते. देशातही मक्याचे क्षेत्र वाढत चालले आहे. मक्यात अनेक पौष्टिक घटक आहेत. मात्र मक्यापासून नेमके काय बनवावे, याची माहिती येथील महिलांना नाही. त्यामुळे रेशन दुकानातून मिळालेला मका थेट व्यापाऱ्याला विकला जातो. मक्यापासून कोणते पदार्थ बनवावे, याची माहिती अंगणवाडी, आरोग्य विभाग व कृषी विभागामार्फत नागरिक व महिलांना दिल्यास मक्याचा सदुपयोग होईल.

सहा महिन्यापासून कमिशन नाही…
जानेवारी महिन्यापासून नागरिकांना धान्याचे मोफत वितरण केले जात आहे. त्यामुळे धान्याचे कमिशन देण्याची जबाबदारी आता शासनावर आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून कमिशन मिळाले नाही. परिणामी प्रपंच कसा भागवावा, असा प्रश्न रेशन दुकानदारासमोर निर्माण झाला आहे. काही दुकाने भाड्याने आहेत. पॉस मशीनसाठी पॅक टाकावा लागतो. हा खर्च कुठून आणावा, असा प्रश्न दुकानदारांसमोर निर्माण झाला आहे.

एकाचवेळी रेशन दुकानदारांना होणार पुरवठा !
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिने कालावधीचा मका एकाचवेळी रेशन दुकानदारांना उपलब्ध करून देण्याचा विचार पुरवठा विभाग करीत आहे. तसेच वितरण लाभार्थ्यांना एकाचवेळी केले जाणार आहे. मात्र पॉस मशीन ही प्रक्रिया स्वीकारणार काय? हा खरा प्रश्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!