Just another WordPress site

Hanuman Chalisa : रामभक्त बजरंगबलीचे प्रसिद्ध स्तोत्र हनुमान चालिसा कधी आणि कोणी लिहिले? घ्या जाणून

गुढीपाडव्याला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. तर उत्तर सभेत राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला.  जर ३ मे पर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर देशभर हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. दरम्यान, हनुमान चालीसा कधी आणि कोणी लिहिली? याची अनेकांना उत्सुकता आहे.



माता अंजनीच्या पोटी जन्माला आलेले हनुमानजी यांची  प्रभु रामचंद्राचे सेवक अशी ओळख आहे. दास्यभक्तीकरता कायम तयार असलेले हनुमानजी प्रभु रामचंद्राच्या आदेशाला आज्ञा प्रमाणं मानत. रावणाने शेपटीला आग लावल्यानंतर संपुर्ण लंकेला क्षणार्धात आपल्या शेपटीने आगीच्या भक्ष्यस्थानी नेणारे हनुमानजीच होते. तर भगवान राम आणि रावण यांच्यात झालेल्या युध्दा दरम्यान लक्ष्मणाचे  मृछा अवस्थेत पडले होते. त्यांचे प्राण केवळ संजिवनी बुटीने वाचणार होते. त्यासाठी  संपुर्ण द्रोणागिरी उचलुन आणत लक्ष्मणाचे हनुमानजी यांनीच  प्राण वाचवले होते. त्यामुळं आजही कलियुगात ज्याला संकटमोचक असं  म्हटलं जाते ते हनुमानजी आहेत. त्यांची स्तुती करण्यासाठी अनेक श्लोक, स्तोत्रे, रचना लिहिल्या गेल्या. ज्यात हनुमान बाहुक, हनुमानाष्टक आणि हनुमान चालीसा या रचना प्रमुख आहेत. यापैकी हनुमान चालीसा ही सर्वाधिक वाचली आणि पठन केली जाणारी रचना आहे.  हनुमान चालीसेच्या रचनेच्या मागे एक रोचक कथा आहे. ज्याची माहिती फार थोड्या जणांना माहिती आहे.  ही गोष्ट त्या वेळची आहे,  ज्या वेळी भारतावर मुघलांचे साम्राज्य होते. मुघलांचे साम्राज्य असतांना तुलसीदास हे एक संत होऊन गेले. तुलसीदास हे १६ व्या शतकातील प्रसिद्ध संत आणि रामभक्त होते. त्यांच्या भक्तीच्या आणि त्यांना प्रभू रामाचे दर्शन झाल्याच्या वंदता त्या काळात सर्वदूर पसरल्या होत्या. ही गोष्ट त्याकाळातील मुघल शासक अकबर यांच्या कानी गेली आणि उत्सुकतेपोटी अकबराने तुलसीदास यांना आपल्या दरबारात बोलावून घेतले. अकबर यांनी तुलसीदास यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की एकतर त्यांनी श्रीरामांचे दर्शन अकबराला घडवावे किंवा प्रभू रामचंद्रा यांच्या स्तुतीपर काव्यग्रंथ रचावा. यावर प्रभू केवळ त्यांच्या भक्तांना दर्शन देतात असं तुलसीदास यांनी सम्राट अकबर यांना संगितले. यावर संतप्त होवून अकबर यांनी संत तुलसीदास यांना कारागृहात  टाकले. आपल्याला या तुरुंगवासातून सोडवावे अशी प्रार्थना तुलसीदास यांनी रामभक्त हनुमानजी यांच्याकडे केली. तीच प्रार्थना ‘हनुमान चालीसा म्हणून प्रसिद्ध झाली. तुलसीदास यांनी अवधी भाषेत हनुमान चालीसा लिहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!