Just another WordPress site

Expensive Mango: काय सांगता! हापुस नाही तर ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा; किंमत ऐकून व्हाल हैराण

सध्या उन्हाळा सुरु आहे आणि आंबा हा उन्हाळ्यात येतो. त्यामुळे बरेचसे लोक या काळात मनभरुन आंबा खातात. आंबा हा चवीला गोड आणि रसाळ असतो, ज्यामुळे त्याला खाण्याचा मोह कोणीही रोखू शकत नाही. आंबा खायला सगळ्यांनाच आवडतं.  मात्र,  जर तुम्हाला विचारलं, जगात सर्वांत महाग आंबा कोणता माहीत आहे का? तर हापूस असं उत्तर अनेकजण देतील. मात्र,  ते चूक आहे. कारण आज आम्ही तुम्हाला अशा एक आंब्याबद्दल सांगणार आहोत. ज्याची फक्त किंमत ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. याच महागड्या आंब्याविषयी जाणून घेऊ.



हायलाईट्स

१. जागतिक पातळीवर हापूस हा जगातील सर्वात महागडा आंबा नाही

२. जगातील सर्वात महागड्या आंब्याचा मान हा जपानमधील आंब्याचा

३.  सर्वांत महाग आंबा म्हणून जपानच्या ताईयो नो तामागो आंबा प्रसिध्द

४.  आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची किंमत २.७ लाख रुपये प्रति किलो


उन्हाळा लागला की सर्वप्रथम खवय्यांना ओढ लागते ती आंबे चाखण्याची. उन्हाळ्यात जवळपास सर्वांनाच आंबे खाणे विशेष आवडतात. उन्हाळ्यात आंब्याचे दर आकाशाला गवसणी घालत असतात, मात्र जिभेची हौस पुरवण्यासाठी आणि हौसेला मोल नसतं या उक्तीप्रमाणे आपण सर्वजण चढ्या दराने आंबे खरेदी करतो आणि मोठ्या चवीने खात असतो. जगात फळांचा राजा अशी ओळख असलेल्या आंब्याच्या अनेक जाती आहेत. आंब्याचे अनेक प्रकार बाजारात विक्रीला येतात. याशिवाय आंब्याला राज्य फळाचा दर्जा आहे.  त्यांपैकी दसरी, चौसा आणि लंगडा आंब्याचे नाव तुम्ही सर्वांनी ऐकले असेल. भारतातील अल्फान्सो किंवा  हापूस हा सर्वांत स्वादिष्ट आंबा मानला जातो. त्याला अक्षरशः स्वर्गीय फळ मानलं जातं. अतिशय सुंदर रंग,  गंध आणि चव असलेल्या या आंब्याला जीआय टॅगही मिळाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी मागणी असते.  युरोप आणि जपानसह अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही हापूसची मागणी वाढू लागली आहे. बाजारात हापूसचा दर इतर आंब्यांच्या तुलनेत अधिक असला तरी जागतिक पातळीवर हापूस हा जगातील सर्वात महागडा आंबा नाही. हे वाचून तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरे आहे. जगातील सर्वात महागड्या आंब्याचा मान हा जपानमधील आंब्याच्या एका प्रजातीला मिळालेला आहे. जगातील सर्वांत महाग आंबा म्हणून जपानच्या ताईयो नो तामागो आंबा प्रसिध्द आहे.  तिथल्या मियाझरी प्रांतात पिकवला जातो.  तसंच संपूर्ण जपानमध्ये विकला सुद्धा जातो. या आंब्याला एका विशिष्ट पद्धतीनं याला पिकवलं  जातं.  यामध्ये प्रत्येक फळ झाडावर असतानाच ते जाळीच्या कपड्यानं बांधलं जातं. आंबा झाडावरच पिकू दिला जातो. हे आंबे झाडावरून तोडले जात नाहीत. यामुळे फळाची चव आणि पौष्टिकता कमी होते, असं इथले शेतकरी मानतात. आंबा  पिकल्यावर तो जाळीतच अडकून राहतो. मग ते काढून विक्रीसाठी दाखल केले जातात. हा आंबा मार्केटमध्ये फळांच्या दुकानांत मिळत नाही. तर हा आंबा खरेदी करण्यासाठी बोली लावली जाते. लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्याला हा आंबा मिळतो. त्यामुळे या आंब्याचे भाव गगनाला भिडतात. या आंब्याचे वजन साधारण ३५० ग्रॅम पर्यंत असते. जपानशिवाय आात बिहारमधील पुनिया आणि मध्य प्रदेशातील जबलपूर येथेही हा आंबा आढळते. हा आंबा भारतात मिळत असला, तरी सामान्य माणूस हा आंबा विकत घेण्याचे स्वप्नही पाहू शकत नाही. कारण त्याती किंमत इतकी आहे की, किंमतीत एक दुचाकी वाहन नक्की येईल. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची किंमत २.७ लाख रुपये प्रति किलो आहे. जे खरोखरंच खूप जास्त आहे.  ताईयो नो तामागो  जातीच्या आंब्याची भारतातील किंमत २१ हजार आहे. पूर्णियामध्ये या जातीचे एक झाड आहे, जे २५ वर्षांपासून अस्तित्वात आहे. या आंब्याच्या चवीबद्दल बोलायचे झाले, तर हा आंबा चवीला गोड तसेच नारळा सारखा लागतो, एवढेच काय तर या आंब्याला अननसाची चवही आहे. जपानमध्ये ताईयो नो तामागो  आंब्याची लागवड ७० आणि ८० च्या दशकात सुरू झाली. जगातील सर्वात महागडा आंबा हा बराच काळ उष्ण वातावरण, सूर्यप्रकाश आणि पाऊस पडल्यानंतर पिकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!