Just another WordPress site

खळबळजनक! दारूड्या नवऱ्याने पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून केली निर्घृण हत्या; पातूरमध्ये हत्येचा थरार, परिसरात खळबळ

अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या शेकापूर येथे एका दारुड्या पतीने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटे उघडीस आली.
शेकापूर येथील गोपीचंद आणि संगीताचा विवाह मागील ८ वर्षांपूर्वी झाला गोपीचंदला दारूचे व्यसन होते या व्यसनातून तो सतत संगीताला मारहाण करायचा, तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. या प्रकरणात संगीताने यापूर्वी तीन वेळा पातूर पोलिसांकडे तक्रारीही केल्या होत्या मात्र, पोलिसांनी ठोस कारवाई केली केली नाही. सततच्या भांडणामुळे ती शेकापुर येथे आपल्यामाहेरी दोन मुलांसह माहेरी राहत होती. काही कालावधीनंतर संगीता गोपीचंद सोबत नांदायला गेली. त्यानंतरही त्यांच्यात वाद व्हायचे. बुधवार १२ ऑक्टोबरला संध्याकाळी या दोघांमध्ये भांडण झाले. भांडणामुळे रागातच झापेलेल्या गोपीचंदने गुरूवारी पहाटे संगीताच्या डोक्यात, मानेवर आणि पायावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात संगीता गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणात संगीताचे वडील रामचंद्र देवा राठोड यांच्या तक्रारी वरून खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून मारेकरी पतीला अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!