Just another WordPress site

‘या’ हॉटेल्समध्ये केवळ कपल्सना एंट्री, लहान मुलांना प्रवेश निषीध्द

प्रवासानिमित्ताने अथवा अन्य कांही कारणाने हॉटेलमध्ये निवासाची वेळ अनेकांवर येत असते. शिवाय, बदलेली जीवनशैली, कामाचा व्याप व सतत व्यस्त असल्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपल्याला आराम हवा असतो. त्यासाठी आपल्याला सुट्टीची आवश्यकता असते. त्यामुळं अनेकदा अविवाहित लोक वर्षातून एकदा फिरायला जातात, परंतु विवाहित लोकांसाठी असे करणे खूप कठीण असते. कारण कोणत्याही सुट्टीवर जाताना त्यांना त्यांच्या मुलांनासोबत घेऊ जावे लागते. कधीकधी आपण मुलांशिवाय सुट्टीची योजना करणे आवश्यक असते. परंतु, काही वेळेस आपल्याला कल्पना नसताना आपण असे काही हॉटेल्स बुक करतो ज्यामध्ये मुलांना एन्ट्री नसते. जाणून घेऊया अशाच काही भारतातील हॉटेल्स बद्दल.

 

द पार्क बागा रिवर गोवा

गोव्यातील या मालमत्तेत १८ वर्षांखालील मुलांना प्रवेश दिला जात नाही. या हॉटेल्समध्ये ज्या जोडप्यांना सोबत वेळ घालवायचा आहे त्यांचासाठी ही जागा योग्य ठरेल.

 

हिमालयातील द आनंदा, ऋषिकेश (उत्तराखंड)

हॉटेल्सच्या नियमांनुसार, १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना येथे प्रवेश प्रतिबंधित आहे. हे हॉटेल शांत असून सुट्टीमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी चांगली आहे. या हॉटेलची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे खूप शांतता असते आणि ती राखण्यासाठी लहान मुलांच्या प्रवेशावर बंदी आहे.

 

तमारा कुर्ग, मडिकेरी (कर्नाटक)

हिरवाईच्या मधोमध वसलेले तमारा कुर्ग हे निसर्गाच्या अगदी जवळ वसलेले आहे. १२ वर्षांखालील मुलांच्या प्रवेशावर येथे बंदी आहे. प्रौढ लोक इथल्या जंगलात ट्रेकिंग, वनस्नान आणि बाहेरच्या जेवणाचा आनंद घेऊ शकतात.

 

वात्स्याना – हिमालयन बुटीक रिसॉर्ट, अल्मोरा (उत्तराखंड)

अल्मोडा येथे असलेल्या या रिसॉर्टमध्ये फक्त प्रौढांनाच प्रवेश मिळू शकतो. या रिसॉर्टमधून तुम्हाला पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते, तसेच इथले वातावरण तुमचे मन जिंकेल. जोडप्यांना येथे सर्व प्रकारची लक्झरी दिली जाते

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!