Just another WordPress site

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड, हा एक शिवसेनेचाच पूर्वनियोजित राजकीय कट होता का?

शिवसेनेचे पहिल्या फळीचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं. शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार आहेत, तसंच ही संख्या ५० पर्यंत जाईल, असा दावा केला. मात्र, आपण शिवसेना सोडलेली नाही असंही ते वारंवार स्पष्ट करत आहेत. दरम्यान, शिंदे हे आमदार घेऊन नॉट रिचेलबल असणं,  विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने असं संजय राऊतांनी ट्विट करणं, ही सगळी खुद्द उद्धव ठाकरे यांची तर  राजकीय खेळी नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. काँग्रेस राष्ट्रवादीला चेकमेट करण्याचा हा डाव उद्धव ठाकरेंनी आखला होता का? अशा चर्चांना आता उधाण आलंय.



महत्वाच्या बाबी 

१. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचं नाराजीनाट्य केंद्रस्थानी

२. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ‘मविआ’ सरकार अडचणीत

३. राष्ट्रवादीला चेकमेट करण्याचा हा उद्धव ठाकरेंचा डाव!

४. ईडीचा सततचा दबाव नियंत्रणात आणण्यासाठी हा सेनेचा कट



एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं. आपल्यासोबत ४० हून अधिक आमदार आहेत असा दावा त्यांनी केला.  त्यामुळं शिंदेंनी शिवसेनेतून बंडाची तलवार उगारल्यानंतर राज्यात एकच राजकीय भूकंप पाहायला मिळाला. मात्र, हा राजकीय भुकंप नसून ही उध्दव ठाकरेंची खेळी असं बोलल्या जातं. कारण, मातोश्रीचे निष्ठावंत आपल्याच पक्षातल्या आमदारांना घेऊन एका रात्रीत महाराष्ट्राबाहेर पडले. एक, दोन नव्हे तर तब्बल ३०-४० आमदारांची फौज त्यांच्यासोबत होती. मात्र, तरीही पक्ष प्रमुखांना याचा थांगपत्ता कसा नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळं एकनाथ शिंदे बंड करणे शक्य नाही. आणि बंड केलंच तर एवढे सगळे आमदार त्यांच्यासोबत जाणं शक्य नाही. दुसरं म्हणजे, २०१९ च्या निवडणूकीत अजित पवारांनीही बंड केलं होतं. मात्र, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये संख्यात्मक फरक आहे, बाकी स्क्रिप्ट दोन्हीकडची सेम होती. दोन्ही प्रकरणात त्यांचं हायकमांड अनभिज्ञ होतं असं वाटत नाही. त्यामुळं हे बंड म्हणजे,  शिवसेनेचं ऑपरेशन कमळ आहे.  कारण, शिवसेनेला भाजप बरोबर जायचेच आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची संपली, जो भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला ठरला होता.  दरम्यान आता भाजपसोबत गेल्यास उपमुख्यमंत्री पद शिवसेनाला मिळणार. शिवाय, नव्या मंत्रीमंडळात  आणखी काही वाढीव मंत्री पदे शिवसेना आपल्या पदरात पाडून घेऊ शकते. शिवाय, केंद्रात एखादे मंत्री पद शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतं. एकनाथ शिंदे यांनी जाहीर बंड केलं त्या दिवशी म्हणजेच २१ जूनला उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय, परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीने तब्बल ११ तास चौकशी केली. भाजप सोबत गेल्यास शिवसेना नेत्यांच्या मागे ईडीच्या जो ससेमिरा मागे लागला, तोही बंद होईल. शिवसेना आमदारांचं पाठबळ देऊन भाजपने सत्ता स्थापन केली तर ईडीचा सततचा दबाव नियंत्रणात राहू शकेल, असा विचार उद्धव ठाकरे यांचा असू शकतो, त्यामुळं एकनाथ शिंदेंचं बंड ही उद्धव ठाकरेंचीच खेळी आहे, असं राजकीय जाणकार सांगतात.  सगळ्यात महत्वाचे सेना भाजप एकत्र येण्याचे कारण म्हणजे,  महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या.  मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या महापालिकांमध्ये सेनेची सत्ता आहे. या निवडणुकीत भाजपसोबत थेट सामना झाला तर मुंबई महापालिकेतली सत्ता जाण्याची सेनेला भीती आहे, त्यामुळं मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी हे बंड म्हणजे, शिवसेनेचा पूर्वनियोजीत प्लॉन असल्याचं जाणकार सांगतात.  शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार चालवणं डोईजड होत होतं. उद्धव ठाकरेंना सरकारमध्ये मुख्यमंत्री असूनही कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि वाटाघाटी वाढत गेल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचा पिच्छा सोडवण्यासाठी हा कट रचला गेला असावा, ही सगळी राजकीय खेळी रचली गेली असावी, अशी शंका राजकीय जाणकार व्यक्त करतात. दरम्यान, राज्यातील राजकारण नेमकं आता काय वळण घेतं हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!