Just another WordPress site

मुंगळा येथील डॉ. विजय केळेंच्या संशोधनाची अमेरिकेत दखल

आंब्याच्या कोयीपासून बी-१२ जीवनसत्त्वाची निर्मिती

अनंता कुटे, प्रतिनिधी

मुंगळा (जि. वाशीम) : मुंगळा येथील भूमिपुत्र आणि वडोदराच्या पारुल विद्यापीठातील (Parul University) प्राध्यापक संशोधक डॉ. विजय दत्तराव केळे (Dr. Vijay Dattarao Kele) यांच्या आंब्याच्या कोयीपासून बी १२ जीवनसत्व निर्माण करणाऱ्या संशोधनाच्या पेटंटची पाहणी करण्यासाठी अमेरिकेतील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि थॉमस एडिसन पेटंट पुरस्कार विजेते डॉ. गोर्धन पटेल (Dr. Gordhan Patel) यांनी वडोदरा येथे केळे यांच्या संशोधन प्रयोगशाळेला भेट दिली.

मुख्यमंत्रिपदावरून ‘मविआ’त धुसफूस! काँग्रेस खासदाराकडून, पटोलेंच्या नावाची झाली घोषणा 

डॉ. विजय केळे यांनी आंब्याच्या कोयीमधून जीवनसत्त्व बी-१२ आणि शरिरासाठी लागणारे महत्त्वाचे घटक वेगळे काढण्यात यश आले आहे. त्यांच्या या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. अन्नतंत्रज्ञान विषयातील संशोधन क्षेत्रात केलेल्या या कार्यामुळे त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व कार्याची दखल घेत, डॉ. गोर्धन पटेल यांनी वडोदरा येथे येऊन त्यांचे संशोधन जवळून पाहिले व त्यांना सोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

चीनमध्ये कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले, १ जानेवारीपासून नवा नियम होणार लागू 

डॉ. गोर्धन पटेल यांनी आतापर्यंत १५० हून अधिक पेटंट आणि २०० हून अधिक संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केलेले आहेत. त्यांना १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.

मुंगळा गावाचे नाव जगभरात पोहोचवणाऱ्या डॉ. विजय केळे यांच्या संशोधन कार्यामुळे देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन संधी निर्माण होतील, असे सांगण्यात येत आहे. केळे यांनी मुंगळा गावाचे नाव भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापार नेल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. या गावातील मोरेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मोहळे यांनी एका दुर्गम भागातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त संशोधक झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!