Just another WordPress site

नोकरी गेली तरी घाबरू नका! दरमहा खात्यात जमा होत राहील पगार, पण कसं? जाणून घ्या

मुंबई : गेल्या दोन वर्षांत अनेक अडचणी आणि चढ उतार आले. अनेकांच्या नोकऱ्या गेला. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. त्यामुळे नोकरी जाण्याची भीती आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. तुमची जर ऐनवेळी नोकरी गेली तर तुमच्याकडे पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोत हवा.

कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. आता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मंदीचं सावट असल्याने पुन्हा एकदा कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे. ट्विटरसोबत काही बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करायला सुरुवात केली आहे. भारतात अशी वेळ आली तर काय करायचं? तुमच्याकडे पर्यायी स्त्रोत उपलब्ध असायला हवा.

तुमचा लाईफ इंशुरन्स, अॅक्सिडेंट आणि मेडिक्लेम आहे पण नोकरीचा इंश्युरन्स आहे का? आता म्हणाल की काय नवी गोष्ट आहे? जॉब इंशुरन्स असा नुसता विमा नाही मात्र इतर पॉलिसीसोबत अतिरिक्त लाभ म्हणून येते. पॉलिसीमध्ये दिलेल्या कोणत्याही कारणासाठी तुमची नोकरी गेली, तर तुम्हाला ठरावीक कालावधीपर्यंत आर्थिक सुरक्षा दिली जाते.

काय आहेत फायदे?

नोकरी गेल्यानंतर पॉलिसीच्या नियम आणि अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला आर्थिक सुरक्षा मिळू शकते. ठराविक कालावधीपर्यंत तुम्हाला पैशांची मदत मिळू शकते. याचा फायदा असा होतो की नोकरी गेल्यानंतर दुसरी नवीन नोकरी मिळेपर्यंत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे होणारी ओढाताण टाळता येते.
काही दिवसांत नोकरी पुन्हा मिळाली की तुम्हाला पहिल्यासारखं सगळं सुरळीत करण्यासाठी मदत होतं. प्रत्येक विमा कंपनीच्या अटी आणि नियम वेगळे असतात. त्यामुळे अशा प्रकरच्या कोणत्याही पॉलिसी घेताना त्या सगळ्या अटी नीट वाचा.
भ्रष्टाचार किंवा कोणत्याही वाईट कारणांसाठी आरोपांमुळे तुमची नोकरी गेली तर तुम्हाला या विम्याचा लाभ घेता येणार नाही. प्रोबेशन कालावधीमध्ये देखील तुमची नोकरी गेलीी तर तुम्हाला इन्शुरन्स मिळणार नाही. अनुबंध अंतर्गत नोकरी मिळाली असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नाही.

नोकरी गेल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती विमा पॉलिसी ज्याच्याकडे काढली आहे त्याला माहिती देणं बंधनकारक आहे. याशिवाय तुम्हाला आवश्यक ती कागदपत्र द्यावी लागणार आहेत. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला पैसे मिळतील. क्लेम रिजेक्ट होऊ नये यासाठी खरी आणि योग्य माहिती देणं आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!