Just another WordPress site

विरोधी पक्षनेते तोंडावर पडले, महाराष्ट्राची बदनामी करायचे धंदे बंद करा; फडणवीसांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis on Solar Panel Project : वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आणखी एक महाराष्ट्रात येणारा 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याचे वृत्त प्रकाशित झाले. त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwarr) यांनी महायुती (Mahayuti) सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे अन् उदासीनतेमुळं हा प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका केली. त्यावर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली.

३५ वर्षे त्यांना दिले, मला पाच वर्षे द्या;  डॉ. सुजय विखेंची संगमनेरात हाक 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांना अऩेक विषयांवर भाष्य केलं. वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकविषयी विचारले असता ते म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी जरा अभ्यास करून बोललं पाहिजे. कुठंतरी बातमी आली की, लगेच त्याच्यावर बोलायचं, माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची हे धंदे बंद केले पाहिजे. कुठलीही माहिती न घेता, केवळ वर्तमान पत्राच्या बातमीवर वक्तव्य करणं योग्य नाही. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांनी कंपनीने खुलासा केला. आम्ही महाराष्ट्रातून गेलो नाही, आम्ही अतिरिक्त गुंतवणूक महाराष्ट्रात करतो, असं त्या कंपनीने सांगितलं. त्यामुळे ते तोंडावर पडले आहे, असं फडणवीस म्हणाले.

३५ वर्षे त्यांना दिले, मला पाच वर्षे द्या;  डॉ. सुजय विखेंची संगमनेरात हाक 

ते म्हणाले, माझी पत्रकारांना विनती आहे की, अशा बातम्या करतांना संबंधित कंपनीला विचारलं पाहिजे. किंवा सरकारचं मत विचारात घेतलं पाहिजे. नाहीतर आपल्याच राज्याची बदनामी होते, असं फडणवीस म्हणाले.

लाडक्या बहिण योजनेवर होत असलेला खर्च हा अन्य योजनामधील पैसा आहे, या विरोधकांकडून होत असलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी आधीच अर्थसंकल्पात तरतुद केली आहे. त्यासाठी कोणत्याही योजनेला धक्का लावला नाही, तडजोड केला नाही, असं फडणवीस म्हणाले.

वडेट्टीवारांची टीका काय?
महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला. नागपुरात सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पांतर्गत 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. राजकीय व प्रशासकीय उदासीनतेमुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेला. हिंदू-मुस्लिम, जीभ कापा, जीभेला चटके द्या, पक्ष फोडा, आमदार पळवा सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार राज्यात असल्यामुळं कॉर्पोरेट कंपन्यांपा आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणं अवघड झालं, तरुणांचे रोजगार हिरावले जात आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!