Just another WordPress site

Cultivation of guava मानलं राव शेतकऱ्याला! दिड एकरात पेरु लागवड करून घेतलं पाच लाखांच्यावर भरघोस उत्पन्न !

पारंपारिक शेतीतून मिळणारे उत्पादन यासाठी लागणारा खर्च आणि मिळणारे बाजारभाव हे समीकरण तोट्याचं झालं. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची सुपीकता बिघडत चालली. त्यामुळं पारंपारिक शेती पध्दतीला फाटा देत शेतकरी आता स्वत:ला बदलू पाहतोय. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही येतंय. अशाच एका पेरू उत्पादक शेतकऱ्याने परिस्थिती समोर हतबल न होता पेरू लागवडीचा यशस्वी प्रयोग करून शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

महत्वाच्या बाबी 

१. मंजाबापू पडोळे यांनी घेतले पेरुचे विक्रमी उत्पादन

२. पेरु लागवड करून शेतकऱ्यांपुढं आदर्श निर्माण केला

३. दिड एकरात केली एक हजार पेरुच्या झाडांची लागवड 

४. पडोळे यांनी पेरुचे घेतले एकरी तब्बल लाखांचे उत्पन्न


शेती क्षेत्रात काळानुरूप मोठे बदल होताना दिसताहेत, आता पारंपरिक पिकांऐवजी नगदी तसेच फळबागांची लागवड करणं गरजेचं बनलं.  फळबाग लागवड करून अनेक शेतकरी मोठी कमाई करताहेत, असेच एक शेतकरी आहेत मंजाबापू पडोळे. मंजाबापू पडोळे देखील पूर्वी इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपरिक पिकांची शेती करत होते. मात्र पारंपरिक पिकातून त्यांना हवे तेवढे उत्पन्न मिळत नव्हते, शिवाय पारंपरिक पिकांना खर्च देखील मुबलक प्रमाणात होत होता. त्यामुळे या सर्वांना कंटाळून त्यांनी पेरूची बाग लावली. या पेरू लागवडीतून ते वर्षाकाठी पाच लाख रुपयांची कमाई करताहेत. आष्टी तालुक्याच्या केळसांगवीमधील मंजाबापू पडोळे यांनी पेरू बागेच्या माध्यमातून विक्रम उत्पादन घेऊन आपल्या परिसतील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला. पडोळे हे एक अत्यंत प्रामाणिक परिश्रम करणारे ध्येयवादी शेतकरी असून त्यांनी आधुनिक शेतीचा अभ्यास करून अनेक कृषी क्षेत्रातील अधिकारी, मित्र आणि नातेवाईक यांचा सल्ला घेऊन फळबाग करण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेताचं त्यांनी अक्षरश: नंदनवन केलं. आपल्या दीड एकरात त्यांनी पेरूची एक हजार झाडांची लागवड केली. या फळबागेवर त्यांनी लाखांच्या घरात खर्च करून उत्तम निगा राखली… त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे  झाडांना कसदार फळे धरली. त्यांच्या या झाडांच्या पेरूंची वजन हे अर्धा ते एक किलो एवढं आहे. महत्वाचं म्हणजे, गाठीशी फळबागेचा कुठलाही अनुभव नसताना, केवळ जिद्द आणि चिकाटीच्या बळावर, त्यांनी पेरूचं  विक्रमी उत्पादन घेतलं. शिवाय, थाई जांभुळाचे  दिड एकरात ४०० झाडे लावलीत. आणि दिड एकरात  एक हजार व्हि.एन.आर. वाणाचीही लागवड केली.  खरंतर  खतं, अवजारं आणि मजुरी यांचे दर वाढल्याने शेती परवडेनाशी झाल्याचं चित्र होतं. मात्र, पडोळे  यांनी आपल्या समोरिल आव्हानंवर मात केली. आपल्या प्रयोगशीलतेने पेरूचे विक्रमी उत्पादन घेऊन त्यांनी सर्वांचे लक्ष वेधलं.  या शेतीनिष्ठ शेतकऱ्याने कनिष्ठ ठरवण्यात आलेली शेती ही आजही उत्तम व्यवसाय ठरू शकते, हे आपल्या कृतीतून सिद्ध केलंय. या फळबागेत त्यांचा  शिक्षक असलेला मुलगा अशोक  आणि सुनबाई हे देखील त्यांना कामासाठी मदत करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!