Just another WordPress site

अमेरिकेत गायीच्या पोटाला छिद्र पाडतात, गायीच्या पोटाला छिद्र पाडल्यानं काय फायदा होतो?

आजकाल अनेक लोक गाय-म्हशी अशी जनावरे पाळतात. कोणाला आवड असते म्हणून तर कोणी दुधाचा व्यवसाय करण्यासाठी पाळतात. भारतामध्ये गायीला खूप महत्व आहे. आपल्याकडे तर गाईची पूजाही केली जाते. मात्र अमेरिकेमध्ये गायीच्या पोटाला छिद्र पाडतात. आता हे ऐकल्यावर तुम्हाला देखील धक्का बसला असेल. हे तुम्हाला भीतीदायक आणि विचित्र देखील वाटले असेल. तुमचा विश्वास नाही बसणार पण हे खरं आहे. मात्र, यात वाईट काहीच नाही. कारण यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

 

महत्वाच्या बाबी

१. प्लास्टिक बेततंय मुक्या प्राण्यांच्या जिवावर
२. अमेरिकेत गायींच्या पोटाला छिद्र पाडलं जातं
३. छिद्र पाडण्याच्या प्रक्रियेला कॅन्यूला म्हणतात
४. ही प्रक्रिया आताची नसून १९२० पासून केली जाते

 

खरंतर शासनाने कितीही प्लॅस्टिक बंदी केली असली तरी त्याला पूर्ण यश आलेले नाही. प्लॅस्टिक चा वापर माणसाकडून होतो. मात्र जीव मुक्या प्राण्यांचा जातो. प्लॅस्टिक पिशवीतून टाकलेले अन्न खाताना प्लॅस्टिकही पोटात जावून मुक्या प्राण्यांचा बळी जातो. प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही आणि पाणी पिणे कमी होते, दुग्धोत्पादनामध्ये घट येते. परिणामी, जनावरे वेगवेगळ्या दुष्परिणामाला बळी पडतात. त्यामुळंच अमेरिकेसोबतच वेगवेगळ्या देशातही गायींच्या पोटाला छिद्र पाडलं जातं. अमेरिकेतील शेतकरी असं गायींच्या पोटाची स्वच्छता करण्यासाठी करतात. कारण शेतकरी गायींना चरण्यासाठी मोकळं सोडतात. अशात गायी प्लॅस्टिकच्या पिशव्या खातात आणि त्याने त्यांना वेगवेगळे आजार होऊ शकतात. तेव्हा या छिद्रातून हात टाकून पोट साफ केलं जातं. गायीच्या पोटाला केल्या जाणाऱ्या या प्रक्रियेला फिस्टूला किंवा कॅन्यूला असं म्हटलं जातं. गायीच्या पोटावरील हे छिद्र नंतर प्लास्टिकने झाकलं जातं. जेव्हा पोट साफ करायचं असेल तेव्हा ते प्लास्टिक काढलं जातं. बरं इतकंच नाही तर असं केल्याने गायीचं आयुष्यही वाढतं, असा दावा केला जातो. गायींच्या पोटाला अशाप्रकारे छिद्र अमेरिकेसोबतच वेगवेगळ्या देशातही पाडलं जातं. महत्त्वाची बाब म्हणजे या छिद्रामुळं गायींना कोणतीही समस्या किंवा अडचण न होता गायी जगतात. पोर्टिया टफ्ट्स विश्वविद्यालयातील एक गाय २००२ पासून पोटावरील छिद्रासोबत जगत आहे. गायींच्या पोटाला छिद्र करण्याचा दुसरा काही उद्देशान म्हणजे, गायीच्या पोटात हे छिद्र केलं जातं. हा उद्देश म्हणजे वैज्ञानिक गायीच्या पचनतंत्राचा अभ्यास करू शकतील. अमेरिकेत गायींच्या पोटावर छिद्र सर्जरी दरम्यान केलं जातं. या सर्जरीत गायीच्या पोटाला इजाही होत नाही आणि याने त्यांच्या आयुष्यावरही काही परिणाम होत नाही. एका रिपोर्टनुसार, ही प्रक्रिया आताची नाही तर १९२० पासून केली जात आहे. या कॅन्यूला सर्जरीमुळं गाय पूर्णपणे फिट राहते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!