Just another WordPress site

मस्तच! आता RTO टेस्टशिवाय फक्त ७ दिवसात Driving Licence मिळणार, फॉलो करा ‘ही’ सोपी प्रक्रिया

ड्रायव्हिंग लायसन्स बनवणं हे आपल्या देशातलं एक डोकेदुखीचं काम आहे. आरटीओमध्ये अर्ज करा, नंतर ड्रायव्हिंग टेस्ट द्या आणि त्यानंतर एक दोन महिन्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं. मात्र आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवणं सोपं झालंय. जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल, मात्र तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट पास व्हाल की नाही, याचा विचार करत असाल, तर चिंता करू नका. आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कोणतीही टेस्ट देण्याची गरज नसून फक्त सात दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं. दरम्यान, यासाठी नेमकी प्रक्रिया काय? याच विषयी जाणून घेऊ.

खरंतर कोणतंही वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. तुम्ही लायसन्सशिवाय वाहने चालवली तर पोलिसांकडून कधीही तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. याशिवाय अपघात झाल्यास तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. त्यामुळे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे.

१८ वर्षे वयोगटातील मुलांना मिळेल लर्निंग लायसन्स
दर महिन्याला हजारो लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. पण ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास झाल्यामुळं अनेकांना परवाना मिळत नाही. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमातही बदल करण्यात आला. मोटार वाहन कायद्याच्या नियमांनुसार, १६ ते १८ वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकतो. पण त्याला फक्त लर्निंग लायसन्स मिळेल. हा परवाना मिळाल्यानंतर ती व्यक्ती केवळ विना गिअरची गाडी चालवू शकणार आहे.

गीअरची गाडी चालवण्यासाठी लागतं पक्क लायसन्स
जर तुम्हाला गीअरसह वाहन चालवायचं असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बनवावं लागेल. एकदा तुम्ही चाचणी उत्तीर्ण केल्यावर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळू शकते. मात्र, परवाना मिळवण्यासाठी तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. तुमच्या घराचा पत्ता आणि वयाचा पुरावा दिल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळेल. तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही लर्निंग लायसन्सवर गाडी चालवू शकत नाही. गाडी चालवण्यासाठी त्यासाठी पक्कं लायसन्स काढावं लागेल.

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी प्रक्रिया काय?
खरं तर भारतात फक्त पेमेंट नाही तर आणखी बऱ्याच गोष्टी डिजिटल झाल्यात. ड्रायव्हिंग लायसन्सही त्याला अपवाद नाही. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आधीप्रमाणे RTOच्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत. ही प्रोसेस आता अगदी सोपी झाली असून तुम्ही घरबसल्या ऑनलाइन लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do या वेबसाईटलावर जावं लागेल. येथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल. हा पर्याय दिसल्यावर त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे द्यावी लागतील, त्यानंतर आरटीओ त्यांची पडताळणी करेल. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, तुम्हाला सात दिवसांच्या आत ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल. लक्षात ठेवा की चाचणी न देता तुम्ही फक्त लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!