Just another WordPress site

ठाकरे गटाला मिळालेल्या ‘मशाल’ या चिन्हावर वाद; ‘मशाल’वर समता पक्षाचा दावा, समता पक्ष निवडणूक आयोगात जाणार

मुंबई : शिवसेनेचं चिन्हं गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘मशाल’ चिन्ह देण्यात आले आहे, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावाला मंजुरी मिळाली. शिंदे गटालाही ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव आणि ढाल तलवार हे चिन्ह आयोगाकडून मिळाले आहे. मात्र आता ठाकरे गटाला मिळालेल्या ‘मशाल’ या चिन्हावर वाद घडून येण्याची चिन्हे आहेत. कारण मशाल या चिन्हावर दिवगंत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने दावा केला आहे. त्यांच्या पक्षाकडून पोटनिवडणूकीत उमेदवार देण्यात येणार असल्याचे समजत आहे.

१९९६ पासून हे चिन्ह आपल्याडे असल्याचे समता पार्टीने दावा केला आहे. यासाठी त्यांनी आता निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. समता पार्टीच्या या आक्षेपावर आता येत्या बुधवारी निर्णय होणे अपेक्षित आहे. तर दुसरीकडे अंधेरीपूर्व निवडणूकीत आपला उमेदवार देण्याची घोषणाही समता पार्टीने केलेला आहे.

“२००४ साली समता पार्टीची राज्यपक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हेचिन्ह देण्यात आले आहे,” असे समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष त्रुनेश देवळेकर यांनी सांगितले. याप्रकरणी आपण निवडणूक आयोगाला इ-मेल पाठवून आपण मशाल चिन्हावर दावा केल्याचाही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!