Just another WordPress site

कॉ. एकनाथराव भागवत स्पर्धेत एम. पी. लॉ कॉलेजच्या संघाने मारली बाजी

अहमदनगर : कॉम्रेड एकनाथराव भागवत यांच्या स्मृतिनिमित्त न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त), अहमदनगर मध्ये आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय वाद विवाद व वक्तृत्व स्पर्धेत ऐश्वर्या तनपुरे व रामहरी जाधव या एम. पी. लॉ कॉलेज, औरंगाबादच्या संघाने वादविवाद स्पर्धेत प्रथम तर वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. अनुजा शेळके व सिद्धी दुधव या जनता विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, कान्हूर पठार, तालुका पारनेर येथील संघाने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.

वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पोर्णिमा ताटेवाड व विष्णू अकोलकर, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद तर चतुर्थ क्रमांक हर्षदीप मेढे, शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांनी मिळविला. वादविवाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक पोर्णिमा ताटेवाड व रामशरण पडोळकर या देवगिरी महाविद्यालयाच्या संघाने तर तृतीय क्रमांक ओम जाधव व रोहन चव्हाण या बलभीम कॉलेज, बीडच्या संघाने पटकावला. तर चतुर्थ क्रमांक राजेश कावरे या फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथील विद्यार्थ्याने मिळविला. वक्तृत्व स्पर्धेत किरण सोनवणे व वैशाली गवते, कै. यशवंतराव गाडे पाटील अध्यापक विद्यालय, अहमदनगर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. तर वादविवाद स्पर्धेत अनुष्का सहस्रबुद्धे व माधव दुसंगे या न्यू लॉ कॉलेज, अहमदनगरच्या संघाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

पारितोषिक वितरणाच्या समारोप समारंभासाठी कॉम्रेड अॅड. बन्सी सातपुते हे प्रमुख पाहुणे तर अध्यक्ष म्हणून अ.जि.म.वि.प्र.स. संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्रजी दरेसाहेब उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी तरुणांना कॉम्रेड भागवतांच्या विचारांची कास धरण्याचे आवाहन केले. आपल्या तर्कबुद्धीच्या जोरावर विचारांची लढाई लढत आपले भविष्य घडवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर अध्यक्षांनी कॉम्रेड एकनाथराव भागवतांच्या आठवणींना उजाळा देत विजेत्यांचे विशेष कौतुक करत भविष्यातील वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले. या स्पर्धेसाठी मा. प्रा. डॉ. अजय दरेकर व मा. संदिप मिरजे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. परिक्षणाबद्दल बोलतांना दरेकर यांनी स्पर्धकांना पाठांतराच्या सवयीतून बाहेर पडत आपली स्वतःची बोलण्याची शैली विकसित करण्याची सूचना केली. आपण आपले मत, आपले विचार स्वतः विकसित करून मांडावे, इतरांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी वाद विवाद व वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेऊ नये, असं त्यांनी सांगितलं.

याप्रसंगी संस्थेच्या सदस्या निर्मलाताई काटे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, कलाशाखेचे उपप्राचार्य डॉ. बी. बी. सागडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस. बी. कळमकर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए. ई. आठरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता मोटे यांनी केले तर डॉ. ज्ञानदेव कोल्हे यांनी आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!