Just another WordPress site

चीनने वाढविले जगाचे टेन्शन! कोणत्याही क्षणी चीनचे तब्बल २३ टनाचे ‘ते’ रॉकेट पृथ्वीवर कुठेही कोसळणार

स्वतःचे स्पेस स्टेशन बनवणाऱ्या चीनला आणखी एक मोठा झटका बसला. चीनच्या अंतराळ संस्थेने पाठवलेले २३ टन वजनाचे रॉकेट प्रक्षेपणानंतर निकामी झाले असून ते पृथ्वीच्या दिशेने येवू लागले. हे रॉकेट मेंगटियन मॉड्यूल घेऊन अंतराळ स्थानकाकडे झेपावले. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आलंय की, चिनी वैज्ञानिक रॉकेटला कक्षामध्ये स्थापित करू शकले नाहीत, त्यामुळं हे जड रॉकेट पृथ्वीच्या दिशेने येऊ लागले.

 

महत्वाच्या बाबी

१. स्वतःचे स्पेस स्टेशन बनवणाऱ्या चीनला मोठा झटका
२. चीनचे रॉकेट पृथ्वीवर कोणत्याही क्षणी कोसळणार
३. निकामी रॉकेट समुद्रात कोसळणार की मानवी वस्तीत?
४. रॉकेट नागरी वस्तीत पडल्यास मोठी हानी होऊ शकते

 

गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय असलेले चीनचे अनियंत्रित रॉकेट पृथ्वीवर कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले. मात्र आता मेंगटियन मॉड्यूलला अवकाशात घेऊन जाणारे चीनचे रॉकेट पृथ्वीवर परत येत आहे. मात्र, ते नेमके कुठे कोसळणार ही जागा निश्चित नसल्याने भिती व्यक्त केली जातेय. आता हे रॉकेट समुद्रात कोसळणार की मानवी वस्तीत, हा प्रश्नही अनेकांना पडला. ते कोठेही पडण्याची शक्यता असल्याने शास्त्रज्ञांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या. २३ टन वजनाचे असणारे हे रॉकेट नागरी वस्तीत पडल्यास मोठी हानी होऊ शकते. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर बहुतांश अंतराळ कचरा हवेतच जळून जातो. क्वचितच असे विशाल तुकडे पृथ्वीच्या पृष्ठभागावर धडकले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चायनीज अवकाश संशोधन संस्थाने त्यांच्या तिआंगॉन्ग या अवकाश स्थानकासाठी लाँग मार्च 5B रॉकेटने मेंगटियन मॉड्यूलला अवकाशात पाठवले होते. रॉकेटचे काम झाल्यानंतर ते पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत येत असून त्याची पडण्याची जागा निश्चित नसल्याचे चायनीज अवकाश संस्थेने सांगितले. याचे काही तुकडे जमिनीवर पडू शकतात. मोड्यूल्सना किंवा उपग्रहांना अवकाशात पोहचवल्यानंतर अशी रॉकेट्स पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतात आणि त्यांच्या वेगामुळे आणि हवेच्या घर्षणामुळे भूपृष्ठावर पोहचण्याअगोदर ती नष्ट जातात. पण चीनचे हे रॉकेट वातावरणात येऊनही संपूर्ण नष्ट झाले नसल्याने ते धोकादायक होऊ शकते. तिआंगॉन्ग अवकाश स्थानक हा चीनचा एक अतिशय महत्वकांक्षी प्रकल्प असून नासाच्या पुढाकाराने उभारलेले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकानंतर चीनचे हे स्थानक दुसरे असणार आहे. अवकाश संशोधनामध्ये चीन स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी अनके प्रयोग करत आहे. चिनी अवकाश संस्थेवर अवकाशात अधिक प्रमाणात कचरा निर्माण करत असल्याचा आरोप जगभरातून होतोय. एरोस्पेस कॉर्पोरेशनच्या कॉर्पोरेट मुख्य अभियंता कार्यालयाचे सल्लागार टेड मुएलहॉप्ट यांनी सांगितले की, चीनचा अवकाशातील ढिगाऱ्याचा जगातील सुमारे ८८ टक्के लोकसंख्येला धोका आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाही चीनचे रॉकेट अनियंत्रित होऊन पृथ्वीच्या वातावरणात घुसले होते. अंतराळ स्थानकावर पाठवलेले हे दुसरे रॉकेट होते. प्रक्षेपणानंतर अवघ्या सहा दिवसांनी त्याचे नियंत्रण सुटले. रॉकेटवरील नियंत्रण गमावल्यानंतर चीनने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. रॉकेटचा काही भाग हिंदी महासागरात पडला ही दिलासादायक बाब होती. त्याचा रॉकेटचा बराचसा भाग जळाला. त्याच्या बूस्टर आणि लाँचरचे काही भाग मलेशिया आणि इंडोनेशियासह आग्नेय आशियातील काही भागांवर पडलेले आढळले. मात्र, या defunct rocket रॉकेटमुळे पृथ्वीवरील कोणत्याही जीवाला किंवा मालमत्तेला धोका नव्हता. मात्र, चीनच्या अंतराळ संस्थेने पाठवलेले २३ टन वजनाचे रॉकेट प्रक्षेपणानंतर निकामी झाले असून ते पृथ्वीच्या दिशेने येवू लागले. मात्र, ते नेमके कुठे कोसळणार ही जागा निश्चित नसल्याने हे रॉकेट धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!