Just another WordPress site

युरोपियन युनियनचा मोठा निर्णय, आता सर्व गॅजेट्ससाठी असेल युनिव्हर्सल चार्जर, वापर करणं सक्तीचं

ब्रुसेल्स – यूरोपमधील बहुतांशी देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युरोपियन युनियन या संघटनेने युनिव्हर्सल चार्जर लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे मोबाईल लॅपटॉप कॅमेरे आणि इतर सर्व उपकरणांमध्ये एकाच प्रकारची सी टाईप केबल आता वापरता येणार आहे अशी उत्पादने करणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना २०२४ पर्यंत आपल्या उपकरणांमध्ये सी टाईप केबल चालेल अशा प्रकारचे बदल करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

एका आकडेवारीनुसार युरोपमधील कोट्यावधी लोक फक्त चार्जर खरेदीसाठी अब्जावधी रुपये खर्च करत असल्याचे आतापर्यंत लक्षात आले आहे युनिव्हर्सल चार्जर चा नियम लागू झाल्यानंतर युरोपियन युनियनमधील ग्राहकांची वार्षिक तीस कोटी पेक्षा जास्त युरोची बचत होणार आहे सर्व उपकरणात चालणारा एकच चार्जर बाजारात आल्याने सुमारे अकरा हजार टन पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक कचराही कमी होणार आहे.

युरोपियन युनियनच्या या निर्णयाचा सर्वात जास्त फटका ऍपल कंपनीला बसणार असून त्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे ऍपल कंपनीच्या कोणत्याही उपकरणांमध्ये सी टाईप केबल चालत नाही युरोपियन युनियनच्या या निर्णयानंतर ऍपल आपल्या सध्याच्या उपकरणांमध्ये बदल करण्यापेक्षा सी टाईप केबल चालेल अशा प्रकारची नवी उपकरणे लॉन्च करण्याची शक्यता आहे युरोपियन युनियनमध्ये एकूण सत्तावीस देश असून त्या सर्व देशांमध्ये हा निर्णय लागू होणार आहे भारतामध्ये मात्र या निर्णयाचा थेट परिणाम होणार नसला तरी बहुतेक इलेक्ट्रॉनिक उत्पादक युरोपमधील आणि परदेशी असल्याने त्यांची जी उपकरणे भारतात उपलब्ध होतात त्यामध्ये आपोआपच सी टाईप केबलचा वापर वाढणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!