Just another WordPress site

Bhiwandi Accident : कोळशाचा कंटेनर झोपडीवर पलटल्यानं तीन मुलींचा मृत्यू


भिवंडी :  विटभट्टीवर कोळसा भरलेल्या ट्रकची ट्रॉली झोपडीवर कोसळल्याने तीन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भिवंडीत घडली. कंटेनरमधून कोळसा खाली करत असताना कंटेनरचा शॉकअल अचानक तुटला आणि कोळशाने भरलेली ट्रॉली मजुरांच्या झोपडीवर कोसळल्यानं  या झोपडीत तीन चिमुकल्या  झोपलेल्या असतानाच अचानक त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. 

मिळालेल्या माहितीनुसार,  भिवंडी तालुक्याती टेंभिवली गावाच्या परिसरात ही  हृदयद्रावक घटना घडली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.  कोळसा खाली करत असताना ट्रकचा शॉकअल अचानक तुटला. त्यानंतर कोळशाने भरलेल्या ट्रकची ट्रॉली शेजारी असलेल्या झोपडीवर कोसळली. या झोपडीत वीटभट्टीवर काम करणारे मजूर आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. कोळसा भरलेली ट्रॉली झोपडीवर कोसळल्याने संपूर्ण झोपडी कोळशाखाली गाडली गेली. या घटनेने एकच खळबळ उडाली. तात्काळ मजुरांनी एकत्र येत कोळसा बाजुला करण्यास सुरुवात केली. मात्र, दुर्दैवाने या अपघातात तीन बहिणींचा मृत्यू झाला होता.  लावण्या, अमिषा  आणि प्रीती अशी अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. या घटनेमुळे वीटभट्टी मजूर बाळाराम वळवी यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली. बाळाराम वळवी हे भिवंडीतील टेंभवली गावातील वीटभट्टीवर एका झोपड्यात आपल्या कुटुंबासोबत राहतात. घटनेच्या दिवशी  वीटभट्टीसाठी लागणारा कोळसा वळवी यांच्या झोपडीजवळ ट्रकमधून खाली करण्यात येत होता. यावेळी वळवी यांची पत्नी जेवण करीत होती तर चार मुले झोपली होती. कोळसा खाली करत असतानाच कंटेनरचा शॉकअल तुटल्याने ट्रॉलीसहीत कोळसा झोपडीवर कोसळला. या दुर्घटनेत झोपेत असलेल्या वळवी यांच्या तीन मुली जागीच ठार झाल्या तर वळवी पती-पत्नी आणि मुलाला वाचवण्यात स्थानिक मजुरांना यश आलं. याप्रकरणी भिवंडी अधिक तपास करीत आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!